राज ठाकरेंच्या उत्तर सभेनंतर आता देवेंद्र फडणवीस घेणार बूस्टर डोस सभा

Devendra Fadanvis | Raj Thackeray| राज ठाकरे यांनी ठाण्यात उत्तरसभा घेत राज्य सरकार आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांचा खरपूस समाचार घेतला
Devendra Fadanvis News| BJP Booster Dose Sabha News Updates
Devendra Fadanvis News| BJP Booster Dose Sabha News Updates
Published on
Updated on

मुंबई : मनसेप्रमुख राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी गुढीपाडवा मेळाव्यातील भाषणानंतर ठाण्यात उत्तरसभा घेत राज्य सरकार आणि राष्ट्रवादीच्या (NCP) नेत्यांचा खरपूस समाचार घेतला. यानंतर आता राज ठाकरे यांनी १ मे रोजी औरंगाबादेत (Aurangaband) जाहीर सभा घेणार असल्याची घोषणाही केली. (BJP Booster Dose Sabha News Updates)

संपूर्ण राज्याचे लक्ष राज ठाकरे यांच्या सभेकडे लागले असताना दूसरीकडे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनीदेखील लवकरच जाहीर सभा घेणार असल्याचे सांगितले आहे. त्यानंतर आता विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या जाहीर सभेची घोषणा करण्यात आली आहे. मुंबईतील सोमय्या मैदानावर ही सभा होणार असून या सभेला ‘बूस्टर डोस’ सभा असे नाव देण्यात आले आहे.

Devendra Fadanvis News| BJP Booster Dose Sabha News Updates
दीपाली सय्यद यांच्यावर राजद्रोहाचा गुन्हा दाखल करा... भाजप महिला मोर्चाची मागणी

भाजप नेते आमदार आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी यासंदर्भात माहिती दिली. राज ठाकरे यांनी हनुमान चालिसाची भूमिका घेतली. त्यानंतर राज्यात सुरु असलेल्या घडामोडी, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना झालेली अटक या सर्व घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेंनी जाहीर सभेची घोषणा केली होती. त्यानंतर, भाजपनेही महाराष्ट्रदिनाचे औचित्य येत्या १ मे रोजी फडणवीसांच्या जाहीर सभेची घोषणा केली आहे.

भाजपच्या वतीने महाराष्ट्रदिनी एक रंगारंग उच्च प्रतीचा सांस्कृतिक कार्यक्रम आनंद घेण्यासाठी भाजपकडून होत आहे. मुंबई अन् महाराष्ट्राची संस्कृती विशद करणारा हा सोहळा असणार आहे. विशेष म्हणजे या कार्यक्रमात देवेंद्र फडणवीस यांची बूस्टर डोस सभा होणार आहे, असे आशिष शेलार यांनी सांगितले. या सभेतून महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) आणि शिवसेनेला कडकडीत डोस फडणवीस देणार असल्याचे आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com