
मुंबई : कथित पत्राचाळ गैरव्यवहार प्रकरणी शिवसेनेचे ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांना तब्बल १०२ दिवसानंतर जामीन मिळाला आहे. त्यांना पीएमएलएच्या विशेष कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. यानंतर आज सकाळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी ते फडणवीसांची भेट घेणार असल्याचे सांगिततले आहे.
राऊत म्हणाले, राज्याचा कारभार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस चालवतात. मी आतमध्ये असताना फडणवीस म्हणाले की, कटुता संपवली पाहिजे. या त्यांच्या भूमिकेचे स्वागत करतो. ते राज्याचे कारभारी असल्याने मी लवकरत त्यांची भेट घेणार आहे. माझ्या बाबतीत जे काही घडलं त्याबद्दल सांगण्यासाठी मी पंतप्रधान मोदी, गृहमंत्री अमित शहा यांचीही भेट घेणार असल्याचे त्यांनी सांगितले.
संजय राऊत पुढे म्हणाले, "तीन महिन्यानंतर पहिल्यांदाच हाताला घड्याळ बांधले आहे. जेलमधून सुटल्यानंतर लोक मला विसरुन जातील, असे वाटलं होते. पण कालपासून जनता माझे स्वागत करीत आहेत. जे भोगायचे होते ते मी भोगलं आहे.
जेलमध्ये मला वर्तमानपत्र वाचण्याची संधी मिळत होती, तेव्हा शिंदे-फडणवीस सरकारनं केलेली चांगली कामे वाचण्यात आली. म्हाडाकडून गरीबांना घरे देण्याचा सरकारचा निर्णय चांगला आहे," राज्याचा कारभार फडणवीस चालवित आहेत, असा टोला राऊतांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना यावेळी लगावला. राऊत थोड्याच वेळात ठाकरे, पवार यांची भेट घेणार आहेत.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi news on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS.
सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट आणि टेलिग्रामवर आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.