
Maharashtra Politics : सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर गंभीर आरोप केला आहे. कृषी विभागातील कथित घोटाळाप्रकरणी दमानियांकडून सातत्याने मुंडे यांच्यावर आरोपांच्या फैरी झाडल्या जात असतानाच आता मुंडेंनी तत्कालीन कृषी सचिव व्ही. राधा यांची फाईलच गायब केल्याचा दावा करत दमानियांनी खळबळ उडवून दिली आहे.
अंजली दमानिया यांनी सोशल मीडियात याबाबत पोस्ट केली आहे. त्यांनी त्यासाठी कृषी, पशुसंवर्धन, दुग्धव्यवसाय विकास व मत्स्यव्यवसाय विभागाने त्यांना गुरूवारी पाठिवलेल्या एका पत्राचा संदर्भ दिला आहे. कक्ष अधिकारी रुचिता पिंगळे यांचे हे पत्र आहे. हे पत्रही दमानियांनी पोस्ट केले आहे.
दमानिया यांनी पोस्टमध्ये म्हटले आहे की, धनंजय मुंडेंनी तत्कालीन कृषी सचिव व्ही. राधा यांची फाइल गायब केली आहे. व्ही. राधा या कृषी सचिव असताना कृषी विभागात झालेल्या भ्रष्टाचाराच्या आणि गौडबंगालाच्या रिपोर्टची फाइल मंत्र्यांना पाठवली. ही फाइल धनंजय मुंडे यांनी गायब केली.
आज लोकायुक्तांच्या सुनावणी दरम्यान मी हे लोकायुक्तांपुढे मांडल्यानंतर प्रतिभा पाटील नावाच्या उप सचिवांनी लोकायुक्तांना कन्फर्म केले, की ही फाइल मंत्र्यांना दिल्याचा जावक क्रमांक आहे, पण ही फाईल त्यांच्या कडून राजीनाम्यानंतर परत आली नाही. धनंजय मुंडे यांना लेखी उत्तर देण्याचे आदेश लोकायुक्तांकडून देण्यात आले आहे, असा दावा दमानिया यांनी केला आहे.
दरम्यान, दमानिया यांनी पोस्ट केलेल्या पत्रानुसार, कापूस, सोयाबीन व इतर तेलबिया पिकांच्या उत्पादकता वाढ व मूल्य साखळी विकासाठी विशेष कृती योजनेअंतर्गत प्राप्त तक्रारीच्या अनुषंगाने कृषी आयुक्तालयाने सादर केलेल्या अहवालाच्या आधारे तत्कालीय प्र. स. (कृषी) यांनी तत्कालीन मंत्री (कृषी) यांच्याकड जी नस्ती/अहवाल सादर केला आहे, त्याबाबतची नस्ती आपण दूरध्वनीद्वारे उपसचिव (कृषी) यांच्याकडे मागणी केलेली आहे.
याबाबत आपणांस कळविण्यात येते की, ही नस्ती या कार्यासनाकडे कार्यवाहीसह/कार्यवाहीविना परत प्राप्त झालेली नाही. तसेच, ही नस्ती या कार्यसनास उपलब्ध करून देण्याबाबत तत्कालीन मंत्री यांच्या खासजगी सचिवांना पत्राद्वारे विनंती करण्यात आलेली आहे. ही नस्ती उपलब्ध झाल्यानंतर आपणास त्याप्रमाणे कळविण्यात येईल, असे कक्ष अधिकाऱ्यांनी पत्रात म्हटले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.