मुंबई : भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांचा आज आठवा स्मृतिदिन. यानिमित्ताने राज्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या स्मृतिदिनाचा (Gopinath Munde Death Anniversary) कार्यक्रम गोपीनाथ गडावर होणार आहे. (Dhananjay Munde News in Marathi)
यानिमित्ताने राज्याचे सामाजिक न्यायमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी आपले काका गोपीनाथ मुंडे यांच्या आठवणींनी उजाळा दिला आहे. धनंजय मुंडे यांनी टिवट करीत गोपीनाथ मुंडे यांना आदरांजली वाहिली आहे.
"अजूनही आठवतो तो 3 जूनचा काळा दिवस...आजही असं वाटतं अप्पा, तो दिवस उजाडलाच नसता तर..अप्पा तुम्ही नाहीत, पण तुमची चेतना आजही आमच्यात आहे, तुमचा आवाज आजही कानात घुमतो! भावपूर्ण आदरांजली अप्पा.." अशा शब्दात धनंजय मुंडेंनी त्यांना आदरांजली वाहिली आहे.
गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी राज्यभरातील मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येणार आहेत. कोरोनामुळे आता दोन वर्षांनंतर गोपीनाथ मुंडे यांना अभिवादन करण्यासाठी मोठ्या प्रमाणात मुंडे समर्थक गोपीनाथ गडावर येणार आहेत. या कार्यक्रमाला मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान हे सुद्धा गोपीनाथ गडावर येणार आहेत.
अपघाती मृत्यू
गोपीनाथ मुंडे यांचं 3 जून 2014 रोजी निधन झालं होतं. 2014 च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला घवघवीत यश मिळाल्यानंतर गोपीनाथ मुंडे यांना केंद्रीय मंत्री म्हणून शपथविधी झाला. त्यानंतर ते पहिल्यांदाच महाराष्ट्रात परत येण्यासाठी 3 जून रोजी सकाळी आपल्या गाडीतून दिल्ली विमानतळावर जात असताना गाडीचा अपघात झाला. त्यांना त्वरीत एम्समध्ये दाखल करण्यात आलं. परंतु उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली होती.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.