Mumbai News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते धनंजय मुंडे यांनी आपल्या राजकीय कारकर्दीत दुसऱ्यांदा मंत्रीपदाची शपथ घेतली आहे. धनंजय मुंडे (Dhananjay Munde), हे राष्ट्रवादी मधील तरुण नेते आहेत. त्यांच्याकडे उत्तम वक्तृत्व शैली आणि संघटन कौशल आहे. ते वंजारी सामाजातून येत असल्यामुळे पक्षाचा ओबीसी चेहरा म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसच्या अजित पवार गटाने त्यांची नियुक्ती मंत्रिपदावर केली आहे.
आपले काका दिवंगत गोपीनाथ मुंडे यांच्या राजकीय बाळकडूतून धनंजय मुंडे यांचे नेतृत्व उभे राहिले. काकांच्या राजकारणाचे धडे घेत असताना त्यांनी भाजपची संस्कृती आपली केली. भाजपमध्ये त्यांची जडणघडण झाली. भारतीय युवा मोर्चामध्ये धनंजय मुंडे राजकारणाला सुरूवात केली.
२००९ च्या लोकसभेच्या निवडणुकीत लोकसभेवर दिवंगत भाजप नेते गोपीनाथ मुंडे निवडून गेले होते, यामुळे परळीतून रिक्त झालेल्या विधानसभेच्या जागेवर धनंजय मुंडे विधानसभेचे उमेदवार उमेदवार म्हणून पाहिले जात होते. यावेळी गोपीनाथ मुंडें यांचा राजकीय वारसदार कोण अशी चर्चा सुरू झाली होती.
मात्र ऐनवेळी विधानसभा निवडणुकीत परळीतून गोपीनाथ मुंडे यांची कन्या पंकजा मुंडे यांची वर्णी लागली. इथेच धनंजय मुंडे यांच्या नाराजीची ठिणगी पडली. गोपीनाथ मुंडेंनी धनंजय मुंडे यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला, मात्र धनंजय मुंडेंनी आपला वेगळा मार्ग वेगळा निवडला होता. 2012 मध्ये धनंजय मुंडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला.
2014 मध्ये गोपीनाथ मुंडेंचे अपघाती मृत्यूची घटना घडली. त्यांच्या मृत्यूनंतर पाच महिन्यातच विधानसभा निवडणूक झाली. परळी विधानसभा मतदारसंघातून धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंविरोधात निवडणूक लढवली. पण पंकजा यांनी २५ हजार मतांनी त्यांचा पराभव केला. मात्र पराभूत झाल्यानंतर ही धनंजय मुंडे यांनी नगरपालिका, जिल्हा परिषद, पंचायत समितीमध्ये त्यांना यश मिळवल्याचे दिसून आले.
2014 मध्ये विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडेंचा पराभव घडून आल्यावर परळीतच्या स्थानिक राजकारणावर त्यांची पकड दिसून आली. यामुळेच राष्ट्रवादीकडून त्यांची विधानपरिषेदेवर आमदार म्हणून पाठवण्यात आले. इतकंच नाही तर त्यांना विधानपरिषेदेचे विरोधी पक्षनेतेपदही त्यांच्याकडे चालून आलं. या दरम्यान ते राष्ट्रवादीचे नेते अजित पवारांच्या जवळ येऊन पोहचले. यामुळे त्यांचं राष्ट्रवादीत प्रस्थ वाढत गेलं.
यानंतर २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पंकजा मुंडेंचा धक्कादायक पराभव घडवून आणला होता. भाजपचा आणि पंकजां मुंडेंच्या परळी या बालेकिल्ल्यात त्यांनी विजय मिळवला आहे. २०१९ मध्ये शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचं सरकार आलं. यावेळी धनंजय मुंडे यांना सामाजिक न्याय मंत्री हे खातं मिळालं. पहिल्यांदा धनंजय मुंडे मंत्रिपदावर विराजमान झाले आहे.
दुसऱ्यांदा मंत्रिपदाची संधी?
अजित पवार यांचा गट भाजपप्रणित शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी मंत्रिमंडळ विस्तारात स्थान मिळाले. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर आता त्यांना राज्याचे कृषिमंत्री कॅबिनेटमंत्रीपदाची संधी मिळाली आहे. दुसऱ्यांदा मंत्रिपदावर विराजमान होण्याची त्यांनी मिळाली आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.