Maharashtra Cabinet Expansion : मंत्री तर झालात, पण खातं कोणतं मिळणार? धनंजय मुंडे म्हणाले..

Maharashtra Cabinet Expansion News : मंत्री झाल्यानंतर मुंडे यांच्या स्वागतासाठी परळीत जय्यत तयारी करण्यात आली आहे.
Maharashtra Cabinet Expansion : Dhananjay Munde
Maharashtra Cabinet Expansion : Dhananjay MundeSarkarnama
Published on
Updated on

Beed News : राज्य सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप याचं घोळ संपता संपेना. मंत्रिमंडळ विस्तार आता पावसाळी अधिवेशनानंतरच होणार असल्याची माहिती मिळत आहे. मागील अनेक दिवसांपासून रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्तारावर आज नवनिर्वाचित मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. जो पर्यंत अधिकृत माहिती माझ्यापर्यंत येत नाही, तोपर्यंत आपण यावर भाष्य करणे योग्य नसल्याचे मुंडे यांनी सांगितले.

धनंजय मुंडे हे आपला मतदारसंघ परळीत पोहचणार आहेत. मंत्री झाल्यानंतर मुंडे यांच्या स्वागतासाठी परळीत जय्यत तयारी करण्यात आली आहे. दरम्यान, परळीत पोहचण्यापूर्वी मुंडे नगर जिलह्यातील शासकीय विश्रामगृहात थांबले होते. यावेळी पत्रकारांशी संवाध साधताना त्यांनी विविध मुद्द्यांवर भाष्य केले आहे. (Latest Marathi News)

परळी मतदारसंघात मंत्री धनंजय मुंडे यांच्या स्वागतासाठी भव्यदिव्य होर्डिंग्स कार्यकर्त्यांकडून लावण्यात आले आहे. होर्डिंग्जवर गोपीनाथ मुंडे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि विशेष म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचेही फोटो लावण्यात आले आहेत. आता शिंदे-फडणवीस-पवार सरकार असल्यामुले तिन्ही पक्षातील नेत्यांचे फोटो होर्डिंग्सवर दिसत आहेत.

Maharashtra Cabinet Expansion : Dhananjay Munde
Pune News : शरद पवारांचा फोटो दाखवून अनेकांना गंडा घालणारा पोलिसांच्या ताब्यात

सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार आणि खातेवाटप यावर प्रश्न विचारले असता धनंजय मुंडे म्हणाले, याबाबत आपल्याला काहीही माहिती नसून, याबद्दलची माहिती यायची असेल तर ती मुंबईतूनच येईल, असे म्हणत त्यांनी थेट उत्तर देणे टाळले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com