Ravindra Dhangekar News: धंगेकरांनी घेतली पक्षाध्यक्ष मल्लिकार्जून खर्गेंची भेट; उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंनाही भेटणार...

रवींद्र धंगेकर यांची २ मार्च रोजी आमदारपदी निवड झाली.
Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar Sarkarnama
Published on
Updated on

Kasba Election: कसबा विधानसभा निवडणुकीच्या दणदणीत विजयानंतर नव निर्वाचित आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे यांची बंगळूरुमध्ये त्यांच्या निवासस्थानी भेट घेतली. या भेटीत त्यांनी कसबा विधानसभा मतदार संघात मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाबद्दल खरगे यांच्याकडून धंगेकर यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी दोघांमध्ये अनेक विषयांवर चर्चा झाली. यावेळी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मोहनजी जोशी उपस्थित होते.

त्यानंतर आमदार धंगेकर आज माजी मुख्मंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मातोश्रीवर पोहचले आहेत. त्यानंतर ते मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचीही भेट घेणार असल्याची माहिती समोर आली आहे. खास बाब म्हणजे उद्या (९ मार्च) विधानसभेत रवींद्र धंगेकर आणि अश्विनी जगताप सदस्यत्वाची शपथ घेणार आहे. त्याआधीच निवडणुकीत पाठिंबा दिलेल्या पक्षनेत्यांशी त्यांनी भेटीगाठी सुरु केल्या आहेत.

Ravindra Dhangekar
Ravindra Dhangekar News: धंगेकरांचा मुंबई दौरा, आघाडीच्या नेत्यांची घेणार भेट : शिवतीर्थावर जाणार?

काही वर्षांपूर्वी रवींद्र धंगेकर हे शिवसेना आणि त्यानंतर मनसेत होते. २०१९ मध्ये त्यांनी कॉंग्रेसमध्ये प्रवेश केला. गेल्या काही वर्षात राजकारणात काम करताना त्यांचे सर्वपक्षीयांशी चांगले संबंध प्रस्थापित केले. या निवडणुकीत महाविकास आघाडीतील नेत्यांसह मनसेच्या स्थानिक पदाधिकारी, नेत्यांनीही त्यांना साथ दिली. यामुळेच शपथविधीपूर्वी धंगेकर आज पक्षनेत्यांच्या भेटीगाठी घेताना दिसत आहे.

दरम्यान, रवींद्र धंगेकर यांची २ मार्च रोजी आमदारपदी निवड झाली. आमदार म्हणून निवड झाल्यानंतर आता सात दिवसांनी म्हणजेच ९ मार्च रोजी रवींद्र धंगेकर यांचा आमदार पदाचा शपथविधी ९ मार्च रोजी होणार होणार आहे. यानंतर धंगेकर हे विधिमंडळाच्या कामाकाजात सहभाग घेऊ शकतात. हे आता सुरू असलेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात त्यांचा आमदार म्हणूव सभागृहात समावेश होणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com