Maratha reservation News : मराठा आरक्षण वनवास यात्रा उधळणार ; मराठा क्रांती ठोक मोर्चाचा इशारा

Maratha Vanvas Yatra : सहा मे रोजी तुळजापूर येथून वनवास यात्रेचे प्रस्थान होणार आहे.
Maratha Reservation
Maratha Reservation Sarkarnama

Maratha Vanvas Yatra Start from Tuljapur to Mantralaya : मराठा समाजाला ओबीसी कोट्यातून आरक्षण मिळावे, या मागणीसाठी तुळजापूर येथून निघणारी मराठा आरक्षण वनवास यात्रा आता वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. ही यात्रा म्हणजे निव्वळ स्टंट आहे. काही जण स्वतःच्या स्वार्थांसाठी ही यात्रा काढत असल्याचा आरोप आता मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून करण्यात आला आहे.

या यात्रेस मराठा क्रांती ठोक मोर्चाकडून विरोध दर्शविण्यात आला आहे. ही यात्रा निघाल्यास ती उधळून लावू , असा इशारा मराठा क्रांती ठोक मोर्चाच्यावतीने अर्जुन साळुंखे आणि महेश गवळी यांनी दिला आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते. राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथी दिनी येत्या सहा मे रोजी तुळजापूर येथून वनवास यात्रेचे प्रस्थान होणार आहे.

Maratha Reservation
Jayant Patil News : "पुढचा मुख्यमंत्री राष्ट्रवादीचाच...''; जयंत पाटलांच्या दाव्यानं आघाडीचं टेन्शन वाढवलं

तुळजापूर ते मुंबई मंत्रालाय असे जवळपास पावणे पाचशे किलोमीटरची ही यात्रा आहे. जोपर्यंत मराठा समाजाचा समावेश ओबीसी आरक्षणात होत नाही, अधिकृत 'जी आर' निघत नाही, तोपर्यंत मुंबईतच ठिय्या मांडून बसणार, कोणत्याही परिस्थितीत माघार घेतली जाणार नाही, यात्रेच्या संयोजकांनी सांगितले.

Maratha Reservation
Bazar Samiti Election: दूध संघानंतर बाजार समितीतही भाजप आमदार चव्हाणांचे वर्चस्व ; चाळीसगावात सत्ता खेचून आणली..

मराठा आरक्षणावर (Maratha reservation) सर्वोच्च न्यायालयाने (Supreme court) राज्य सरकारची पुनर्विचार याचिका नुकतीच फेटाळली आहे. मराठा आरक्षणासाठी सरकार कायदेशीर लढा देणार आहे. यासाठी उपचारात्मक याचिका (क्युरेटिव्ह याचिका) दाखल करण्याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या उपस्थितीत झालेल्या बैठकीत नुकताच घेण्यात आला.

Maratha Reservation
Dharangaon Bazar Samiti Election : गुलाबराव पाटलांची होमपीचमध्ये जोरदार बॅटींग ; धरणगावात आठ जागांवर..

"क्युरेटिव्ह याचिका दाखल करण्याची कार्यवाही त्वरित करण्यात यावी, याशिवाय आपल्याला आता मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध करण्यासाठी विस्तृत पाहणी करावी लागेल. हे करताना नेमण्यात येणारी संस्था सुद्धा निष्पक्ष, कार्यक्षम असणे गरजेचे आहे. या संस्थेस सर्व प्रकारच्या सुविधा, मनुष्यबळ, प्रशासनाचे सहकार्य उपलब्ध करून देण्यात येईल, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com