हा नंबर पाठ करून ठेवा 112... पोलिसांसाठी कोठूनही डायल करा...

Ajit Pawar| Dilip Walse Patil| मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गृह विभागाच्या डायल 112 आणि महिला व बालक सायबर गुन्हे प्रतिबंध केद्र प्रकल्पाचे उद्धघाटन करण्यात आले.
dial 112
dial 112
Published on
Updated on

मुंबई : आज गुढी पाडव्याच्या मुहूर्तावर मुंबई (Mumbai) मधील कफ परेड येथील वर्ल्ड ट्रेड सेंटरमध्ये गृह विभागाच्या डायल 112 आणि महिला व बालक सायबर गुन्हे प्रतिबंध केद्र प्रकल्पाचे उद्धघाटन करण्यात आले. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनीदेखील व्हिडीओ कॉंन्फरन्सिंगच्या माध्यमातून या कार्यक्रमाला हजेरी लावली.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) म्हणाले की, डायल 112 आणि महिला व बालक सायबर गुन्हे प्रतिबंध केंद्रामुळे मुंबईतील पोलीस दल आधुनिक आणि सक्षम करण्याची गुढी आपण उभारली आहे. कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे दोन वर्ष आपली फार अडचणीत गेली. जनतेला नाईलाज म्हणून घरात बसावं लागल. पण महाराष्ट्राच्या जनतेने पोलिसांबद्दल विश्वास दाखवला. या संकटाच्या काळात अनेक पोलिसांनी आपले प्राण गमावले. पण राज्यसरकार त्यांच्या पाठीशी आहे हे यातून आपण दाखवतो आहोत. राज्यातीस गुन्हेगारीवर अंकुश ठेवणं थोडं कठीण जायचं कारण गुन्हेगार नवनवीन तंत्रज्ञान वापरत होते. आता मात्र या प्रकल्पामुळे राज्याचे पोलीस खाते अधिक आधुनिक होत आहे.

dial 112
आज सरकार श्रेय घेत आहे, पण मेट्रो-३ चं अपश्रेयदेखील त्यांना घ्यावं लागेल...

मुख्यमंत्रीही नेहमी अशा कामात आपल्याला मदत करत असतात. 2022-23 करता निधी उपलब्ध करून दिला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार जेव्हा पहिल्यांदा गृहराज्यमंत्री होते तेव्हा दिवंगत वसंतराव नाईक यांनी त्यांना अनेक जबाबदाऱ्या दिल्या होत्या. दिवंगत आबा पाटील यांनी देखील खूप चांगल काम पोलीस खात्यासाठी केलं होतं. त्यांच्यापासून आज दिलीप वळसे पाटील यांच्या पर्यंत हे काम अविरत सुरुच आहे, अशा भावनाही यावेळी अजित पवार यांनी व्यक्त केल्या.

आजच्या पाडव्याच्या दिवशी उद्धव ठाकरे यांनी अनेक कामांना वेळ दिला, आजपासून अनेक नवीन प्रकल्प सुरु होत आहेत. ही वाहने देत असताना इलेक्ट्रिक वाहने सुद्धा आली आहेत. त्यासाठी चार्जिंग स्टेशनं उभी करावी लागतील. याची जबाबदारी महिंद्रा अँड महिंद्रा यांनी जबाबदारी घेतली आहे. याची नक्की देश पातळीवर याची नोंद घेतली जाईल. परंतु प्लॅन आणि विश्वास सार्हतेला धक्का लागणार नाही याची काळजी प्रत्येकाने घेतली पाहिजे, असा सल्लाही यावेळी अजित पवारांनी दिला.

यावेळी राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीदेखील आपली भूमिका स्पष्ट केली. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पोलीस दलाबद्दल अत्यंत संवेदनशील आहेत. डायल112 प्रकल्पाचे उदघाटन होतेय याचा आनंद आहे. पण नागरिकांना तात्काळ मदत मिलनेही रास्त होत. 100 नंबर वर कॉल आल्यावर कधीतरी लोकेशन मिळणं अवघड व्हायचं. पण आता 112 वर कॉल आल्यावर आपोआप लोकेशन कळतं. त्यामुळे मदत तात्काळ पोहचवता येते. शक्ती विधेयकालाही आपण नुकतीच मंजूरी दिली. विधेयकावर राष्ट्रपती यांची स्वाक्षरी झाल्यावर तो उत्तम कायदा अस्तित्वात येईल. व्यक्त होणं आणि शेअर करणं आजच्या युगाचा मूलमंत्र झाला आहे. पण तो कधी कधी घातक ठरतो.तेव्हा कायदा आणि सुव्यवस्था सांभाळणारा हा विभाग जातीत जास्त किती सक्षम करता येईल यासाठी आम्ही काम करत आहोत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com