Nitin Desai Death Case
Nitin Desai Death CaseSarkarnama

Nitin Desai News : आत्महत्येपूर्वी नितीन देसाईंची दिल्लीत भाजप नेत्यांना भेट की उद्धव ठाकरेंकडे मदत? आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी !

Nitin Desai Death Case : "जो न्याय सनी देओलला तो देसाईंना का नाही? "

Mumbai News : सुप्रसिद्ध कला दिग्दर्शक नितीन देसाई यांनी आत्महत्या करत आपली जीवनयात्रा संपवली. कर्जतमधल्या त्यांच्या एनडी स्टुडिओमध्ये त्यांनी आत्महत्या केली होती. या आत्महत्येप्रकरणी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी भाजपवर गंभीर आरोप लावले आहेत. आत्महत्या करण्यापूर्वी त्यांच्यावरील कर्जाच्या संदर्भात काही मदत मिळावी म्हणून देसाई यांनी दिल्लीत भाजप नेत्यांची भेट घेतली होती. मात्र त्यांनी कसलीही मदत मिळाली नाही, असा दावा संजय राऊत यांनी केला आहे. यामुळे पुन्हा एकदा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत. (Latest Marathi News)

Nitin Desai Death Case
Pravin Darekar On Nitin Desai: देसाई यांच्या आत्महत्येची चौकशी करा ; दोषींना जेलमध्ये टाका..

संजय राऊतांच्या या आरोपावर आता भाजपकडूनही प्रत्युत्तर देण्यात आले आहे. भाजपचे आमदार प्रवीण दरेकर यांनी संजय राऊतांवर पलटवार करत, देसाई यांनी उद्धव ठाकरेंची भेट घेतली होती, असा दावा केला आहे. दरेकर म्हणाले, "नितीन देसाई हे उद्धव ठाकरेंकडे मदत मागायला गेले होते याची माझ्याकडे खात्रीलायक माहिती आहे. ठाकरेंचे प्रवक्ते संजय राऊत त्यांच्या मृत्यूचे जे भांडवल करत आहेत, जे राजकारण करत आहेत. माझा दावा हा खरं आहे की नाही याचे उत्तर संजय राऊत यांनी द्यावं, तसेच अनेक मराठी उद्योजक यांनी उद्धव ठाकरेंकडे मदत मागायला गेले होते, पण त्यांनी त्यांना तिकडून हाकलून दिलं, याची यादी मी जाहीर करणार आहे, असा इशारा दरेकरांनी दिला.

काय म्हणाले संजय राऊत?

"भाजपचा स्टार प्रचारक असलेला सनी देओला त्यांच्या बंगला लिलावाप्रकरणी बँकेनी नोटीस पाठवली होती. मात्र भाजपच्या नेत्यांनी त्यांना एकाच दिवसात दिलासा दिला. भाजपने देओलला सगळी मदत केली. नोटीस मागे घेतली गेली, याबाबत आमचे काहीच म्हणणे नाही. पण जो न्याय सनी देओलला दिला गेला, तोच न्याय नितीन देसाईंना का दिला गेला नाही?" असा सवाल राऊतांनी भाजपला विचारला आहे.

Nitin Desai Death Case
Pravin Darekar On Sanjay Raut: आपण सारेच चोर आहोत, म्हणत दरेकर झाले आक्रमक, म्हणाले राऊतांना अटक करा !

"एकीकडे देशातील लोकांचे हजारो कोटी रूपये घेऊन, घोटाळे करून विदेशात पळून गेले, त्यांची कर्जमाफी होते. त्यांच्यावर कारवाई होत नाही. म्हणजे जे भाजपसोबत त्यांच्यावर कारवाई केली जात नाही. मात्र दुसरीकडे एक हरहुन्नरी महाराष्ट्राचा- मराठी माणूस ‘शे-दोनशे’ कोटींचे कर्ज फेडू शकला नाही. जे स्वप्न त्यांनी एन डी स्टुडिओच्या रूपाने उभारलं होतं, ते स्वप्न डोळ्यांसमोर विखुरताना दिसत आहे. हे सहन झालं नाही, म्हणून आत्महत्या करतो. हे अतिशय खेदजनक आहे," असे राऊत म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com