Hindu Rashtra Politics: हिंदुराष्ट्र' च्या ट्विटवरून भाजपमध्ये मतमतांतरे; मुनगंटीवार म्हणाले, ट्विटची चौकशी होणार...

भारत हा हिंदुराष्ट्र होता हिंदुराष्ट्र आहे आणि हिंदुराष्ट्र राहिल... असे ट्विट भाजपच्या (BJP) अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आले होते
Hindu Rashtra Politics:  हिंदुराष्ट्र' च्या ट्विटवरून भाजपमध्ये मतमतांतरे; मुनगंटीवार म्हणाले, ट्विटची चौकशी होणार...

मुंबई : ''भारत हा हिंदुराष्ट्र होता हिंदुराष्ट्र आहे आणि हिंदुराष्ट्र राहिल... असे ट्विट भाजपच्या (BJP) अधिकृत ट्विटर हँडलवरुन करण्यात आले होते. पण या पोस्टनंतर भाजपच्या गोटात एकच खळबळ उडाली आहे. विरोधकांनीही भाजपला धारेवर धरलं आहे.तर भाजपच्या गोटातही अस्वस्थताही निर्माण झाली आहे. (Differences of opinion in BJP over 'Hindurashtra' tweet; Mungantiwar said, the tweet will be investigated...)

भाजपचे ज्येष्ठ नेते सुधीर मुनगंटीवर यांनी याबाबत आपली भूमिका मांडली आहे. ''भाजपचा असा कोणताही अजेंडा नाही. पण असं ट्विट कुणी आणि का केलं? याचा तपास सुरु आहे.असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. तसेच भाजपच्या सोशल मीडिया सेलमधून अशी पोस्ट चुकून केली? की जाणूनबूजून केली गेली? याबाबतही चौकशी केली जाईल, असं मुनगंटीवार यांनी म्हटलं आहे. (Maharashtra Politics)

Hindu Rashtra Politics:  हिंदुराष्ट्र' च्या ट्विटवरून भाजपमध्ये मतमतांतरे; मुनगंटीवार म्हणाले, ट्विटची चौकशी होणार...
Congress Meeting News : राऊतांचे अजून ठरले नाही; मुत्तेमवार, ठाकरे झाले सक्रिय, पण आता चतुर्वेदी गायब?

दरम्यान, हिंदुराष्ट्र... ही भाजपची अधिकृत भूमिका आहे का, असा प्रश्न माध्यमांनी विचारल्यानंतर, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंनी यांनी, हिंदुराष्ट्र म्हणजे बहुसंख्य हिंदूंचा देश, अशी त्याची व्याख्या केली. यासोबत भाजपच्या इतर नेत्यांनीही हिंदुराष्ट्र हीच आपली भूमिका असल्याची प्रतिक्रिया दिली होती.

तर दुसरीकडे, भाजपच्या ट्विटर हँडलवरुन करण्यात आलेल्या या ट्विटवरुन विरोधकांनीही आक्रमक पवित्रा घेतला आहे. गेल्या काही दिवसांत अनेकदा भाजपच्या राष्ट्रीय नेत्यांनी सार्वजनिक मंचावरून हिंदू राष्ट्राच्या मागणीची अनेक वक्तव्येही केली होती. आता महाराष्ट्रातही हिंदू राष्ट्राचा मुद्दा उपस्थित झाला आहे. (Maharashtra Politics)

Hindu Rashtra Politics:  हिंदुराष्ट्र' च्या ट्विटवरून भाजपमध्ये मतमतांतरे; मुनगंटीवार म्हणाले, ट्विटची चौकशी होणार...
Karnataka Election JDS News : माजी पंतप्रधानांच्या सुनेचं तिकीट कापलं..; वहीनींना डावलून सामान्य कार्यकर्त्यांला..

भाजपाच्या या ट्विटनंतर महाराष्ट्र काँग्रेसचे (Congress) प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.''जे लोक देशाच्या संविधानाला मानत नाहीत. त्या लोकांकडून आणखी काय अपेक्षा करावी, भारताचं एक स्वतंत्र संविधान आहे. संविधान आहे म्हणूनच देवेंद्र फडणवीस राज्याचे उपमुख्यमंत्री झाले. संविधान नसतं तर ते उपमुख्यमंत्री झाले नसते, अशी खरमरीत टीका नाना पटोल यांनी केली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com