Pune News : शिंदे सरकार फार काळ टिकणार नाही..; वळसे पाटलांनी स्पष्ट सांगितलं..

Dilip Walse Patil on Shinde government : भाजप- शिंदे गटातीलआमदारांच्या मनातील भावना जरा अवघड..
Eknath shinde, ,Dilip Walse Patil
Eknath shinde, ,Dilip Walse Patil Sarkarnama

Dilip Walse Patil on Shinde government : महाविकास आघाडीचे नेते, माजी मंत्री दिलीप वळसे पाटील यांनी शिंदे-फडणवीस सरकारवर टीका केली आहे.

वळसे-पाटील माध्यमांशी बोलत होते. राज्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचे झालेले नुकसान, कायदा सुव्यवस्था आदी विषयावर दिलीप वळसे पाटील यांनी सरकारवर निशाना साधला.

Eknath shinde, ,Dilip Walse Patil
Third Front : काँग्रेसचं टेन्शन वाढलं ; BJPच्या विजयी रथाला हे आठ पक्ष रोखणार ; तिसऱ्या आघाडीच्या हालचाली सुरु

राज्यात अवकाळी पावसामूळे नुकसान झालं आहे. राज्य सरकारकडून नुकसानीचे पंचनामे झालेले नाहीत, संपाचे कारण सांगून पंचनामे झालेले नाहीत. सर्व सरकारी यंत्रणा ठप्प आहे. हे पंचनामे करून शेतकऱ्यांना अनुदान मिळावे. शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी, यासाठी प्रयत्न करणार आहे. याबाबत विधानसभेत आवाज उठवू ,"

Eknath shinde, ,Dilip Walse Patil
Sanjay Raut : शिंदे-फडणवीस सरकारला चुंबनाचे वावडे कधीपासून ? ; दोघेही उघडपणे अनैतिक पद्धतीने एकत्र राहताहेत..

"राज्यात अवकाळी पावसामुळे नुकसान होत असताना कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांना त्याचे गांभीर्य नाही. केंद्र सरकारच्या योजना शेवटच्या माणसापर्यंत जात नाहीत, सरकार फक्त राजकारण करण्यात व्यग्र आहे," असा आरोप वळसे पाटलांनी केला आहे.

"शिंदे-फडणवीस सरकारमध्ये सारे काही चांगले सुरु नाही, हे सरकार फार काळ टीकेल , असे वाटत नाही. सरकार जो पर्यंत चालेल तो पर्यंच चालेल एक दिवस सरकार पडेल. भाजप- शिंदे गटातीलआमदारांच्या मनातील भावना जरा अवघड दिसत आहेत," असे वळसे पाटलांनी सांगितले.

राज्यातील सत्तासंघर्ष न्यायालयात सुरु आहे.न्यायालयाने निकाल राखून ठेवला आहे. याबाबत पत्रकारांनी वळसे पाटलांना विचारले असता ते म्हणाले की शिंदे-ठाकरे गटाबाबत सुप्रीम कोर्ट काय निकाल देई, याचा अंदाज बांधणे योग्य नाही, असे वळसे पाटील म्हणाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com