Deepali Sayed कुठल्या पक्षात जाणार ? ; रांगोळीतून दिला वेगळाच संकेत

Deepali Sayed : इन्स्टाग्रामवर त्यांनी फोटो शेअर करीत उत्सुकता वाढवली आहे.


uddhav thackeray, deepali sayed,  eknath shinde
uddhav thackeray, deepali sayed, eknath shinde sarkarnama
Published on
Updated on

Deepali Sayed : शिवसेनेत फूट पडल्यानंतर समाजमाध्यमांवर ठाकरे गटाचा किल्ला सक्षमपणे लढविणाऱ्या ठाकरे गटाच्या नेत्या अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी काही दिवसापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली. तेव्हापासून त्या शिंदे गटात जाणार अशी चर्चा सुरु आहे. (Deepali Sayed latest news)

शिंदे गटात जाणार का ? या प्रश्नाला उत्तर देताना त्यांनी ‘वेट अँड वॉच’असे उत्तर काही दिवसापासून त्यांनी दिले होते. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेकडे सगळ्याचे लक्ष होते. आता ऐन दिवाळीत दिपाली सय्यद यांनी रांगोळीतून वेगळाच संकेत दिल्याने राजकीय विश्लेषकांच्या भुवया उंचावल्या आहेत.

आपल्या घरासमोर दिपाली सय्यद यांनी कमळाची रांगोळी रेखाटली आहे. इन्स्टाग्रामवर त्यांनी फोटो शेअर करीत उत्सुकता वाढवली आहे. दिपाली सय्यद यांच्या या फोटोमुळे त्या शिंदे गटाऐवजी भाजपमध्ये जाणार का ? असा प्रश्न विचारण्यात येत आहे.



uddhav thackeray, deepali sayed,  eknath shinde
Eknath Shinde : ठाकरे, नार्वेकर सोबत येणार का ? ; मुख्यमंत्री शिंदेंचं सूचक विधान, म्हणाले..

रांगोळीतून सय्यद यांनी 'कमळा'ची आकृती रेखाटली आहे.'दिवाळीतील दिव्यांची दीपमाळ अशाच संकल्पांनी भरलेली असावी, संकल्परूपी एक एक दीप जेव्हा माळेत सामावतो तेव्हा ती दीपमाळ तयार होते. अशाच अनेक संकल्पांनी सजलेली ही दीपमाळ जीवनातील अंध:कार संपवून प्रकाश देईल अशा शुभेच्छा' असा मजकूर दीपाली सय्यद यांनी शेअर केला आहे.

"शिवसेनेकाम करताना मला आता साडेतीन वर्षं झाली आहेत. स्क्रीनवर येऊन टिप्पणी केली, कुरघोड्या केल्या, तरच तुम्ही राजकारणात सक्रिय आहात असा समज करण्याची गरज नाही. जी लोक कामे करतात त्यांनाच लोक पाठिंबा देतात. ‘प्रत्येकजण आपापली मते मांडत आहे. प्रत्येकाने आपला गट निर्माण केला आहे. लवकरच माझाही गट दिसेल. सध्या मी शिवसेनेत आहे."असे दिपाली सय्यद काही दिवसापूर्वी म्हणाल्या होत्या.

दिपाली सय्यद या ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा होती. त्यात त्यांनी २३ ऑक्टोबरला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेतली होती. "मागील काही दिवसांपासून माझा आवाज मातोश्रीपर्यंत पोहोचत नाही. याबद्दल मी लवकरच बोलेन. मातोश्रीपर्यंत पोहोचण्यासाठी मेहनत घ्यावी लागते. परंतु मुख्यमंत्र्यांना भेटण्यासाठी तितकी मेहनत घ्यावी लागत नाही," असं दिपाली सय्यद म्हणाल्या होत्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com