पुन्हा जितेंद्र आव्हाडांच्या विरोधात लढणार का? दिपाली सय्याद यांनी स्पष्टच सांगितले

Dipali Syed News : सरकारनामाच्या कार्यक्रमात दिपाली सय्यद यांचे भाष्य
Deepali Sayed News
Deepali Sayed NewsSarkarnama
Published on
Updated on

Deepali Sayed News : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांच्या विरोधात शिवसेनेच्या नेत्या व अभिनेत्री दिपाली सय्यद यांनी निवडणूक लढवली होती. मात्र, आता दिपाली सय्यद या बाळासांहेबांची शिवसेना म्हणजे शिंदे गटात प्रवेश करणार आहेत. त्या निमित्ताने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे दिपाली सय्यद (Deepali Sayed) यांच्या माध्यमातून पुन्हा एकदा आव्हाड यांना आव्हान देणार का? अशी चर्चा सुरु झाली होती.

दिपाली सय्यद या 'सरकारनामा ओपन माईक' सिजन 2 या कार्यक्रमात बोलत होत्या. या कार्यक्रमात भाजप नेते आमदार अतुल भातखळकर, काँग्रेस (Congress) नेते सत्यजीत तांबे, राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी, बाळासाहेबांची शिवसेनेच्या नेत्या दिपाली सय्यद, मनसे नेते संदीप देशपांडे, शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या आमदार मनिषा कायंदे उपस्थित होत्या.

Deepali Sayed News
मोठी बातमी : ‘विनायक मेटेंच्या निधनानंतर शिंदे गटाकडून शिवसंग्राम फोडण्याचा प्रयत्न’

या कार्यक्रमात राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांनी कळवा मुंब्रा मतदार संघातून जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधात निवडणूक लढणार का? या प्रश्नावर दिपाली सय्यद यांनी आपली भूमिका मांडली. या वेळी त्या म्हणाल्या, मी शिंदे गटात लवकरच प्रवेश करणार आहे. शिंदे गटात महिलांचे संघटन तयार करण्यासाठी काम करणार आहे. मुख्यमंत्री शिंदे (Eknath Shind) साहेब जी भूमिका देतील ती मी पार पाडणार. त्यांनी आदेश दिला तर पुन्हा निवडणूक लढवेन. मात्र, शिंदे साहेब जो आदेश देतील तो मला मान्य असले असे त्यांनी स्पष्ट केले.

Deepali Sayed News
राऊतांच्या इशाऱ्यानंतर अजित पवारांचे महाविकास आघाडीबाबत मोठं भाष्य

सरकारनामाचा विशेष कार्यक्रम 'ओपन माईक सिजन 2' लवकर प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या कार्यक्रमात नेत्यांनी एक मेकांना चागल्याच कोपरखळ्या मारल्या. तसेच अडचणीचे प्रश्न विचारुन कोंडीही केली. तर हास्यविनोद करत कार्यक्रमात रंगत आणली. या कार्यक्रमात नेत्यांनीच नेत्यांना प्रश्न विचारले. त्यावर त्यांची धमाल उत्तरे दिली तसेच एकमेकांना चांगलेच चिमटेही काढले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com