Maharashtra Politics : अजित पवार-देवेंद्र फडणवीस यांच्यामध्ये फोनवरून चर्चा

सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता या दोघांमधील फोनवरील बोलणं महत्वाचं मानलं जातं.
Ajit Pawar and Devendra Fadnavis
Ajit Pawar and Devendra FadnavisSarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विरोधी पक्षनेते अजित पवार (Ajit Pawar) हे भाजपसोबत (BJP) जाणार अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगलेली असतानाच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्यासोबत त्यांची फोनवरून चर्चा झाल्याची माहिती आहे. एकीकडे अजितदादांच्या नावाभोवती संशयाचे वादळ उठलेले असताना या दोघांमधील फोनमुळे ते आणखी गडद होण्याची शक्यता आहे. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता या दोघांमधील फोनवरील बोलणं महत्वाचं मानलं जातं. (Discussion between Ajit Pawar and Devendra Fadnavis over phone)

गेली काही दिवसांपासून अजित पवार यांच्याबाबत महाराष्ट्रात वेगवेगळी चर्चा सुरू आहे. अजित पवार राष्ट्रवादीत नाराज, ते भाजपसोबत जाणार अशा बातम्या येत आहेत. मात्र, अजितदादांनी त्यावरील मौन सोडत आज आपण मरेपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेससोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यानंतरही त्यांच्याबाबत बातम्या येतच आहेत.

Ajit Pawar and Devendra Fadnavis
Tawde Committee Report : महाराष्ट्रासह 'या' तीन राज्यांत भाजप खासदारांची संख्या घटणार : पक्षाने नेमलेल्या समितीचा अहवाल

अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात आज फोनवरून चर्चा झाल्याचे सांगितले जात आहे. आपण देवेंद्र फडणवीस यांना फोन केल्याचे खुद्द पवार यांनी सांगितले आहे. शेखर निकम यांच्या वशिष्ठी नदीसंदर्भात, तर अण्णा बनसोडे आणि अजित पाटील यांनी मतदारसंघातील मांडलेल्या विषयासंदर्भात आपली फडणवीस यांच्यासोबत चर्चा झाल्याचे खुद्द अजित पवार यांनी स्पष्ट केले आहे.

Ajit Pawar and Devendra Fadnavis
Operation Lotus in Maharashtra : महाराष्ट्रात भाजप खासदारांची संख्या घटणार : तावडे समितीच्या अहवालानंतर राज्यात ‘ऑपरेशन लोटस’

आज सकाळपासून आठ आमदार हे अजित पवार यांना भेटून गेले आहेत. त्या सर्वांनी आपण देवेंद्र फडणवीस यांना बोलले पाहिजे, असा आग्रह धरल्यानंतर अजितदादांनी फडणवीसांना फोन केल्याचे सांगितले जात आहे. तसेच, आमदार धनंजय मुंडे यांनीही आपल्या परळी मतदारसंघातील प्रश्नावर फडणवीस यांची भेट घेतली होती. याच कामासंदर्भात अजित पवार यांनी फडणवीसांना फोन करून या गोष्टी अवगत केल्या आहेत. सध्याची राज्यातील परिस्थिती पाहता या दोघांमधील फोनवरील बोलणं महत्वाचं मानलं जातं.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com