Cabinet Expansion 2023 : तीन इंजिनचे सरकार मजबूत, पण केव्हाही कोसळू शकते; शिंदे गटातील आमदाराच्या वक्तव्याने खळबळ

Maharashtra Government Cabinet Expansion : मंत्रिमंडळ विस्तारावर दिल्लीत चर्चा
Maharashtra Cabinet Expansion
Maharashtra Cabinet ExpansionSarkarnama
Published on
Updated on

Bacchu Kadu News : राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यामुळे शिंदे गटात नाराजी आहे. त्यामुळे राष्ट्रवादीच्या मंत्र्यांचा शपथविधी होऊन 10 दिवस उलटले तरी खातेवाटप जाहीर झालेले नाही. शिंदे गटातील आमदार आपली नाराजी उघडपणे व्यक्त करत आहेत. यातच आमदार बच्चू कडू यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

बच्चू कडू यांनी माध्यमांशी संवाद साधला, यावेळी कडू म्हणाले, राज्यातील तीन इंजिनाचे सरकार मजबूत आहे. मात्र, ते केव्हाही कोसळू शकते. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे ते सरकार मजबूत करण्याचा प्रयत्न करतील. बच्चू कडू (Bacchu Kadu) यांनी केलेल्या वक्तव्यामुळे या विषयाची चांगलीच चर्चा रंगली आहे.

Maharashtra Cabinet Expansion
West Bengal Election : पश्चिम बंगालमध्ये ममतादीदींचाच बोलबाला; स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत विरोधकांचे पानिपत

अजित पवार व त्यांच्या समर्थकांच्या सरकारमधील समावेशामुळे शिंदे यांच्यापुढील समस्यांत कमालीची वाढ झाली आहे. राष्ट्रवादीच्या सरकारमधील समावेशामुळे शिंदे गटातील आमदारांमध्ये अस्वस्थता आहे. तसेच भाजपाचेही काही आमदार नाराज असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर कडू यांनी मनातील खदखद व्यक्त केली आहे.

बच्चू कडू म्हणाले, अजित पवारांना (Ajit Pawar) अर्थमंत्रीपद मिळू नये अशी काही आमदारांची इच्छा आहे. महाविकास आघाडीच्या काळात अर्थमंत्रीपदी असताना त्यांनी निधीची पळवापळवी केली. त्यामुळेच आम्ही इकडे आलो होते. आम्ही अजित पवार यांचा आमच्या मतदारसंघातील हस्तक्षेप सहन करणार नाही. हे आता तीन इंजिनाचे सरकार आहे. ते मजबूत आहे, मात्र, केव्हाही कोसळू शकते, असे कडू म्हणाले आहेत.

Maharashtra Cabinet Expansion
Cabinet Expansion 2023 : खातेवाटपाचा तिढा कायम; अजितदादा आता गाठणार दिल्ली

दरम्यान, मंत्रिपदाच्या खातेवाटपावर मुंबईमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde), उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यामध्ये अनेक बैठका झाल्या. मात्र, या बैठकांमध्ये कुठलाही तोडगा निघाली नाही. त्यामुळे अजित पवार दिल्लीला गेले आहेत. दिल्लीमध्ये केंद्रीय मंत्री अमित शाह यांच्याशी अजित पवार चर्चा करण्याची शक्यता आहे.

Edited by : Amol Jaybhaye

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com