Thane Lok Sabha Election : नरेश म्हस्केंच्या उमेदवारीमुळे नाराज भाजप पदाधिकाऱ्यांच्या मनधरणीस यश ; राजीनामे घेतले मागे!

Thane BJP News : जाणून घ्या नेमकं काय घडलं अन् भाजप आमदार संजय केळकर काय म्हणाले आहेत?
Naresh Mhaske Thane Loksabha
Naresh Mhaske Thane LoksabhaSarkarnama

Loksabha Election 2024 : महायुतीच्या जागा वाटपात ठाणे लोकसभा मतदार संघ शिवसेनेकडे गेला आहे आणि या मतदारसंघामधून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नरेश म्हस्के यांचे नाव जाहीर केले. मात्र म्हस्के यांचे नाव जाहीर होताच नवी मुंबई आणि भाईंदर येथील पदाधिकाऱ्यांनी कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करीत राजीनामा दिले. त्याचे पडसाद ठाण्यात देखील उमटले, ठाणे भाजपच्या जिल्हा कार्यकारणीच्या बैठकीत देखील अनेक पदाधिकाऱ्यांना नरेश म्हस्के यांना देण्यात आलेल्या उमेदवारीवरुन नाराजी व्यक्त केली.

तसेच काही पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे देत आम्ही काम करणार नसल्याचा इशाराच दिला. मात्र अवघ्या दीड तासाच्या चर्चेनंतर नाराजीनाट्य दूर झाले असून पदाधिकाऱ्यांनी राजीनामे मागे घेतले असल्याचा दावा केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Naresh Mhaske Thane Loksabha
Bjp New Mumbai Party Leader News : नरेश म्हस्केंना उमेदवारी;ठाण्यात 65 भाजप पदाधिकार्‍यांचे राजीनामे; CM शिंदेंवरही आरोप

ठाणे लोकसभेवरून शिवसेना आणि भाजप यांच्यात रस्सीखेच सुरू होती. त्यात महायुतीचे मेळावे देखील पार पडले. असे असतांना महाराष्ट्र दिनी शिवसेना शिंदे गटाने नरेश म्हस्के यांची उमेदवारी जाहीर होताच, भाजपच्या गोटात नाराजी पसरली. त्यात नवीमुंबईतील पदाधिकाऱ्यांनी गुरुवारी सकाळी राजीनामे दिल्यानंतर मिराभाईंदरमधील पदाधिकाऱ्यांनी देखील राजीनामा देत नाराजी व्यक्त केली. तर शुक्रवारी महायुतीचे उमेदवार नरेश म्हस्के(Naresh Mhaske) हे आपला उमेदवारी अर्ज भरणार असल्याने त्या निमित्ताने ठाण्यातील भाजप कार्यालयात जिल्हा कार्यकारणीची बैठक आयोजित करण्यात आली होती.

या बैठकीला जिल्ह्यातील 150 पदाधिकारी उपस्थित होते. परंतु या बैठकतही अनेक पदाधिकाऱ्यांनी थेट नाराजीचा सुर लावला. काही पदाधिकाऱ्यांनी आपले राजीनामे दिले. तर काही पदाधिकाऱ्यांनी संजय केळकर(Sanjay Kelkar) यांना उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गळ घालत घोषणाबाजीही केली. तसेच आतापर्यंत शिंदे सेनेकडून महापालिका असेल किंवा विधानसभा निवडणूक असेल त्यात कशा पध्दतीने वागणूक देण्यात आली. याचा पाढाच अनेक पदाधिकाऱ्यांनी वाचला.

Naresh Mhaske Thane Loksabha
Narendra Modi Interview : '...म्हणून मी उद्धव ठाकरेंचा कायम सन्मान करणारच!'; PM मोदींचं मोठं विधान

भाजप(BJP) नसेल तर आम्ही काम करणार नसल्याचा इशाराही या बैठकीत देण्यात आला. अखेर कार्यकर्त्यांचे म्हणने ऐकल्यानंतर वरीष्ठांनी त्यांची मनधरणी केली. आपले उमेदवार हे नरेंद्र मोदी असून त्यांना आपल्याला पुन्हा पंतप्रधान करायचे आहे, त्यांच्यासाठी आपल्याला महायुतीचा धर्म पाळावाच लागेल अशी हाक वरिष्ठांनी कार्यकर्त्यांना दिली. दिड तास खलबते झाल्यानंतर अखेर कार्यकर्त्यांची मनधरणी करण्यात आली. तसेच पदाधिकाऱ्यांना आपले राजीनामे देखील मागे घेतले.

कार्यकर्त्यांची भावना असते, मात्र मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचे असल्याने सर्वांना एकदिलाने काम करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. तसेच त्यांची नाराजी दूर करुन त्यांनी आपले राजीनामे देखील मागे घेतले आहेत. भाजप आमदार संजय केळकर म्हणाले.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com