Narendra Modi Interview : '...म्हणून मी उद्धव ठाकरेंचा कायम सन्मान करणारच!'; PM मोदींचं मोठं विधान

Narendra Modi On Uddhav Thackeray : 'उद्धव ठाकरे ज्यावेळी आजारी होते. त्यावेळी मी त्यांना फोन करत...'
M Modi, Uddhav Thackeray
PM Modi, Uddhav ThackeraySarkarnama

Narendra Modi News : एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर महाविकास आघाडी सरकार तर कोसळले. शिवाय उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावे लागले. यानंतर शिदेंनी 40 आमदारांसह भाजपसोबत सत्ता स्थापन केली.तसेच शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्हही शिंदेंच्या शिवसेनेला मिळालं. तेव्हापासून शिवसेना पक्ष फोडल्याचा आरोप भाजपवर होतो. त्याचा मास्टरमाईंड म्हणून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसह पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाहांवरही ठपका ठेवला जातो.

याचवरुन सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीत उद्धव ठाकरेंकडून मोदी-शाहांवर टीकेची झोड उठवली जात आहे. पण आता पंतप्रधान नरेंद्र मोदींनी उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरेंविषयी मोठं विधान करतानाच त्यांच्याशी असलेल्या नातेसंबंधावरही मोठं भाष्य केलं आहे.

M Modi, Uddhav Thackeray
Kalyan Politics : आधी 'पॉकेटमनी'वरून डिवचलं; आता राजू पाटील अन् श्रीकांत शिंदेंचे गळ्यात गळे

पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांनी बाळासाहेब ठाकरेंचा मुलगा म्हणून मी उद्धव ठाकरेंचा मान-सन्मान करणारच आहे. कारण ते माझे शत्रू नसून उद्या त्यांच्यावर कोणतेही संकट आलं तर एक कुटुंब म्हणून त्यांना मदत करणारा मी पहिला व्यक्ती असेल अस ठाम मत त्यांनी व्यक्त केले.याचवेळी त्यांनी बाळासाहेबांचे विचार आहे. त्यासाठी मी जगणार आहे असेही ठणकावले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका मराठी वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शिवसेना, ठाकरे कुटुंबाविषयी मोठी विधानं केली आहे.

मोदी म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचं माझ्यावर अतिशय प्रेम होतं. मी त्यांचं हे ऋण कदापि विसरु शकणार नाही. आणि याचमुळे आमच्याकडे सर्वाधिक आमदार असतानाही आज महाराष्ट्राचा मुख्यमंत्री शिवसेनेचा आहे. हीच माझ्याकडून बाळासाहेबांना वाहिलेली श्रद्धांजली आहे. आम्ही मागच्या निवडणुकीत एकमेकांविरोधात लढलो. मी त्या निवडणुकीत बाळासाहेबांविषयी एक शब्दही काढला नसल्याचा पुनरुच्चारही पंतप्रधान मोदींनी यावेळी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

तसेच मला उद्धव ठाकरेंनी (Uddhav Thackeray) कितीही शिव्या दिल्या तरी मी बोलणार नाही असं जाहीरपणे सांगितलं होतं. कारण माझी बाळासाहेबांवर श्रद्धा आहे.त्यामुळे त्यांच्या कौटुंबिक समस्या काय आहेत,तो माझा विषय नाही.मात्र, मी बाळासाहेबांचा प्रचंड आदर करत आलो आहे आणि आयुष्यभर तो करत राहीन” अशी ग्वाही मोदींनी यावेळी दिली.

ऑपरेशनपूर्वी मोदींनी ठाकरेंना काय दिला होता सल्ला?

पंतप्रधान मोदी यांनी यावेळी उद्धव ठाकरेंविषयी एक महत्त्वाचा खुलासा केला. ते म्हणाले, उद्धव ठाकरे ज्यावेळी आजारी होते.त्यावेळी मी त्यांना फोन करत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली होती.तसेच रश्मी ठाकरे (Rashmi Thackeray) यांना फोन करुन उद्धव ठाकरेंच्या प्रकृतीची विचारपूस करत होतो. ऑपरेशनपूर्वी उद्धव ठाकरे यांनी माझ्याशी फोनवरुन संवाद साधला होता. त्यावेळी भाईसाब काय सल्ला असं विचारलं होतं. त्यावेळी मी त्यांना तुम्ही ऑपरेशन करा. बाकी चिंता सोडा. आधी शरीराकडे लक्ष द्या असं आवर्जून सांगितल्याचेही मोदी यावेळी म्हणाले.

(Edited By Deepak Kulkarni)

M Modi, Uddhav Thackeray
Crime News : 'अनुपजी..भाजपचे पैसे पोहचले नाही!', 'त्या' व्हिडिओने खळबळ

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com