दिशा सॅलियन प्रकरण: नितेश राणेंचे सुचक ट्विट; चंद्रकांत पाटलांचा खळबळजनक खुलासा

Disha Salian| Nitesh Rane| या सर्व प्रकरणावर आज पुन्हा नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी सूचक ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केल आहे
NItesh Rane
NItesh Rane

मुंबई : दिवंगत अभिनेता सुशांतसिंग राजपूत (Sushantsingh Rajput) याची मॅनेजर दिशा सॅलियन हिचा बलात्कार करून तिची हत्याच करण्यात आली आहे. सुशांतसिंग आणि दिशा यांनी आत्महत्या केली नाही तर त्यांची हत्या झाली असल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी केंद्रीय मंत्री नारायण राणे (Narayan Rane) यांनी केला.

या प्रकरणी आता मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी नारायण राणे यांच्या विरोधात थेट महिला आयोगाकडे तक्रार केली आहे. यासंबंधीचे एक पत्रही त्यांनी महिला आयोगाला पाठवले आहे. त्यानंतर महिला आयोगाने या पत्राची दखल घेत मालवणी पोलीस स्टेशन यांना ४८ तासांमध्ये याचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.

NItesh Rane
राणे शिवसेनेच्या वादात रुपाली चाकणकरांची उडी

या सर्व प्रकरणावर आज पुन्हा नारायण राणे यांचे पुत्र नितेश राणे यांनी सूचक ट्विट करत या प्रकरणावर भाष्य केल आहे. 'मालवणी पोलिस ठाण्याची भूमिका पहिल्या दिवसापासूनच संशयास्पद आहे. आता त्यांना दिशा सॅलियन प्रकरणाचा अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. पण ८ जूनच्या रात्री त्या ठिकाणी रोहन राय पण उपस्थित होता आणि दिशा मोकळ्या जागेत येऊन त्याच्याशी का बोलत होती? असा सवाल नितेश राणेंनी ट्विटद्वारे केला आहे.

त्याचबरोबर मुंबईच्या महापौरांनी राज्य महिला आयोगाला पत्र लिहून तक्रार दिली आहे. त्यानंतर त्यांनी मालवणी पोलीस स्टेशन दिशा सालियन प्रकरणाचा अहवाल सादर करण्याचे आदेश दिले. म्हणजेच 8 जूनच्या रात्री काहीही घडले नाही हे दाखवण्यासाठी राज्य सरकारकडून मोठा प्लॅन केला जात आहे. चला, मला आनंद आहे की, शेवटी ते स्वतःची कबर खोदत आहेत! असा टोलाही नितेश राणेंनी लगावला आहे.

NItesh Rane
पाठिंबा द्यायची सवय आता बंद करावी लागेल; राष्ट्रवादीच्या भूमिकेनं आघाडीत अस्वस्थता

त्याचबरोबर नितेश राणेंनी आणखी दोन ट्विट करत या प्रकरणाकडे लक्ष वेधलं आहे. ८ जूनच्या रात्री दिशाला पार्टीतून मालाडला काळ्या रंगाच्या मर्सडिजमधून घरी नेण्यात आले होते. सचिन वाझेंकडेही अशाच रंगाची काळी मर्सडिड गाडी तपास यंत्रणांकडे आढळून आली होती. ही तीच गाडी आहे का? ९ जून रोजीच त्यांना पुन्हा पोलीस खात्यात रुजू करण्यात आले. त्याचे या प्रकरणाशी काही कनेक्शन आहे का, असा सवालही त्यांनी उपस्थित केला आहे. मालवणी पोलीस ठाण्याने निष्पक्ष तपास न केल्याने प्रकरण सीबीआयकडे देण्यात आले. बरोबर? आणि आता त्याच पोलीस ठाण्याला राज्य महिला आयोगाने अहवाल सादर करण्यास सांगितले? ते कितपत न्याय्य आहे? ते कोणाला वाचवण्याचा प्रयत्न करत आहेत? असे अनेक सवाल नितेश राणेंनी उपस्थित केले आहेत.

दरम्यान, यासोबतच भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही या प्रकरणावर भाष्य करत मोठा खुलासा केला आहे. ७ मार्चनंतर सर्व पुरावे सादर करणार असल्याचा खळबळजनक खुलास त्यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com