Disha Salian Case : दिशा सालियान प्रकरणात अनिल परब सभागृहात कडाडले, 'मनिषा कायंदे सरड्याप्रमाणे रंग बदलतात, ठाकरेंचा संबंध असेल तर...'

Anil Parab Warns Manisha kayande Chitra wagh : आदित्य ठाकरे यांना सीआयडीने क्लिनचीट दिल्यानंतर मनीषा कायंदे यांनी ट्विट करत भाजप आणि राणेंवर टीका केली होती. ते ट्विट वाचून अनिल परब यांनी सभागृहात वाचून दाखवले.
Anil Parab Warns Manisha kayande
Anil Parab Warns Manisha kayande sarkarnama
Published on
Updated on

Disha Salian Case : विधान परिषदमध्ये दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांच्या विरोधात प्रस्ताव सभागृहात एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांनी आणला. त्यावर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अनिल परब यांनी प्रत्युत्तर दिले.

परब म्हणाले, आदित्य ठाकरेंची केस ही कोर्टात पाच वर्ष चालू आहे. त्यामध्ये सीबीआयची चौकशी झाली. त्यामध्ये सीआयडीची चौकशी झाली. परत याची एसआयटीची चौकशी झाली. एसआयटीच्या चौकशीचा रिपोर्ट टेबल कुठे केला. रिपोर्ट का नाही दिला गेला? एसआयटीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा त्यांनी दीड वर्षात एसआयटीचा रिपोर्ट टेबल केला नाही.

'आदित्य ठाकरेंचा जो काही या केसशी संबंध असेल त्याची काळजी कोर्ट घेईल. एसआयटी रिपोर्ट सबमिट केला नाही त्या अधिकाऱ्यांवर कारवाई करा. दुसरी गोष्टी संजय राठोड, जयकुमारा गोरेच्या केसवर तोंड उघडा. फक्त ठरवून कराताय. जयकुमारच्या राजीनाम्या मागणी करा. ', असे आव्हान देखील परब यांनी सभागृहात दिले.

'शिळ्या कढीला उत आणून तुमचे सगळे विषयी बाजुला जावे म्हणून करता काय? औरंगजेबाची कबर काल आरएसएसने पूर्ण चेपून काढली. आज दुसऱ्या विषयी नाही. आदित्य ठाकरेंची चौकशी करायला आमचे काही म्हणणे नाहीये. या सभागृहात मंत्री उत्तर देताना काय सांगतात तर प्रकरण न्यायालया समोर आहे.न्याय प्रविष्ट आहे.', असे देखील परब म्हणाले.

मनीषा कायंदे टार्गेट

अनिल परब यांनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेच्या आमदार मनीषा कायंदे यांचे ट्विट सभागृहात वाचून दाखवले. आदित्य ठाकरे यांना सीआयडीने क्लिनचीट दिल्यानंतर मनीषा कायंदे यांनी ट्विट करत भाजप आणि राणेंवर टीका केली होती. ते ट्विट वाचून दाखवताना परब म्हणाले, मनीषा कायंगे आत्ता वरिष्ठा खूश करण्यासाठी आरोप करत आहेत. त्यांची नजर आता उपसभापतिपदावर आहे. सरड्यापेक्षा जास्त रंग बदलला. सरड्याला पण शरम वाटली असेल.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com