OBC Reservation : पुन्हा 'तारीख पे तारीख' ; स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीची सुनावणी लांबणीवर

Maharashtra Politics : राजकीयदृष्ट्या ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे.
obc reservation
obc reservationsarkarnama
Published on
Updated on

Supreme Court Hearing ON OBC reservation: राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत सर्वोच्च न्यायालयातील ओबीसी आरक्षणाबाबतची नियोजीत सुनावणी पुन्हा एकदा लांबणीवर पडली आहे.

आता ही सुनावणी १८ जुलै रोजी होण्याची शक्यता आहे. सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्यासमोर ही सुनावणी होणार आहे. आज (शुक्रवारी) ही सुनावणी होणार होती.

गेल्या अनेक दिवसांपासून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकाबाबत 'तारीख पे तारीख'चा सिलसिला सुरू आहे. गेल्या वर्षभरापासून याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झालेली नाही. अशातच आज होणारी सुनावणीही लांबणीवर पडली आहे. आता पुढची सुनावणी १८ जुलैला होईल का? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

obc reservation
Supreme Court MLA Disqualification: सोळा आमदारांच्या अपात्रतेबाबत न्यायालय आज नार्वेकरांना काय आदेश देणार ?

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या संपूर्ण प्रकरणाची उत्सुकता ऑगस्ट २०२२ पासून महाराष्ट्राला आहे. या प्रकरणा संदर्भात रोज नव्या तारखा समोर येत आहेत. या एका याचिकेवर २३ महानगरपालिका, २५ जिल्हा परिषदा आणि २०७ नगरपालिका, पंचायत समित्यांचं भवितव्य अवलंबून असणार आहे. याव्यतिरिक्त ९२ नगरपरिषदांमधल्या ओबीसी राजकीय आरक्षणाचाही मुद्दा अद्याप प्रलंबित आहे.

राजकीयदृष्ट्या ही सुनावणी अत्यंत महत्त्वाची आहे. यापूर्वीही सर्वोच्च न्यायालयानं एप्रिल, मे महिन्यातील तारीख दिली होती. पण त्यादिवशीही सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी कोणतीही सुनावणी पार पडली नाही.

obc reservation
Eknath Shinde On Thackeray: महाकलंक तर तुम्ही आहात; मुख्यमंत्र्यांचा उद्धव ठाकरेंवर घणाघात

सुप्रीम कोर्टाच्याच २००६ च्या आदेशानुसार, स्थानिक स्वराज्य संस्थांचा कालावधी जास्तीत जास्त ६ महिने लांबवता येऊ शकतो. गेल्या दोन तीन वर्षांपासून महाराष्ट्रातल्या या निवडणुका लांबणीवर पडल्या आहेत. सगळा कारभार प्रशासकांच्या हातात गेला आहे. त्यात सुप्रीम कोर्टाला तर सुनावणी घ्यायलाही वेळ नाही. त्यामुळे आता नव्या तारखेच्या दिवशी सुनावणी होणार की, पुन्हा नवी तारीख मिळणार, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

(Edited By : Mangesh Mahale)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com