Mankoli Bridge : माणकोली पूल ठरणार निवडणुकीचा मुद्दा, विरोधक करणार विजयाचा दावा

Eknatha Sinde : आठ वर्षांपूर्वी भूमिपूजन झाले, मात्र अजूनही पुलाचे उद्घाटन न झाल्याने डोंबिवलीकर नाराज आहेत.
Eknath Sinde, uddhav thackeray
Eknath Sinde, uddhav thackeraysarkarnama
Published on
Updated on

Dombivli : गेल्या आठ वर्षांपासून सुरू असलेल्या माणकोली पुलाचे काम पूर्ण झाले असले तरी हा पूल अद्यापही सुरू झाला नाही. त्यामुळे डोंबिवलीकर नाराज असल्याचे दिसत आहे. त्यामुळे हा पूल जर लवकरात लवकर सुरू झाला नाही तर याचा परिणाम येत्या निवडणुकीत सत्ताधाऱ्यांच्या मतदानावर होणार, अशी चर्चा दबक्या आवाजात रंगली आहे. या चर्चांची खबर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनादेखील लागली असून लवकरच ते कल्याण-डोंबिवलीचा दौरा करणार असून माणकोली पुलाचे उद्घाटन करणार असल्याचे सांगितले जात आहे.

पुलाच्या उद्घाटनाविषयी विरोधकांकडून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना टार्गेट केले जात आहे. या पुलाचे उद्घाटन झाले नाही तर डोंबिवलीकरांच्या नाराजीचा सामना सत्ताधाऱ्यांना करावा लागेल, हेच ओळखून पुलाच्या (bridge) उद्घाटनावरून विरोधक सत्ताधाऱ्यांना टार्गेट करीत असून मतांची बेगमी करीत आहेत.

Eknath Sinde, uddhav thackeray
Pimpri Chinchwad Politics : सरकारनामा इम्पॅक्ट! थेट मोदींकडे तक्रार झाल्याने पालिकेचे सुस्त प्रशासन झाले जागे

गेली अनेक वर्षे या पुलासंदर्भात ऐकत आहोत. मात्र हा पूल अद्यापही पूर्ण झालेला नाही. त्यामुळे नाराज असल्याचे मत अनेक नागरिक उघडपणे बोलून दाखवत आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या डोळ्यात माणकोली पुलाचे उद्घाटन होणार असल्याची माहिती यावेळी देण्यात येत आहे. साधारण 25 जानेवारी रोजी त्यांचा डोंबिवली येथे विकासकामांच्या उद्घाटनासाठी दौरा होणार आहे. या उद्घाटनादरम्यानच ते माणकोली पुलाचेदेखील उद्घाटन करणार असल्याची चर्चा रंगलेली पाहायला मिळते.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

8 वर्षांपूर्वी भूमिपूजन

हा संपूर्ण पूल बांधण्यासाठी 223 कोटी इतका खर्च मंजूर करण्यात आला आहे. या पुलाची रुंदी 27 मीटर इतकी असून लांबी 1.24 किलोमीटर आहे. हा पूल तयार झाल्यास डोंबिवली-कल्याण येथे शिळ फाटा आणि भिवंडी बायपास रस्ता येथे होणारी वाहतूककोंडी कमी होण्यास मदत होणार आहे. त्याचबरोबर इंधनाची बचत होणार असून प्रवासाचा वेळ वाचणार आहे. या पुलाचे भूमिपूजन तत्कालीन मुख्यमंत्री आणि आताचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सप्टेंबर 2016 मध्ये केले होते. मात्र अद्यापही या पुलाचे उद्घाटन झाले नसल्याने डोंबिवली पश्चिम येथील नागरिक नाराज असल्याचे पाहायला मिळत आहे.

(Edited By Roshan More)

R...

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com