Mumbai : विधानसभाध्यक्षांच्या निकालानंतर उद्धव ठाकरे गटाकडून त्यांना हा निकाल मान्य नसल्याचे सांगितले आहे. आपण सर्वोच्च न्यायालयात जाणार असल्याचेदेखील ठाकरे गटाने स्पष्ट केले. मात्र, निकालानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपली प्रतिक्रिया देत उद्धव ठाकरेंना टार्गेट केले.
लोकशाहीमध्ये बहुमताला महत्त्व असते. बहुमत आमच्याकडे होते. विधानसभेत आणि लोकसभेतही. या निकालाने घराणेशाही, एकाधिकारशाही मोडीत निघाली, असा टोला शिंदेंनी उद्धव ठाकरेंना लगावला. पक्षप्रमुख आहोत, म्हणून वाटेल तसे निर्णय घेऊ शकत नाही. मनमानी पद्धतीने पक्ष चालवू शकत नाही. बाकीचे सहकारी त्याला विरोध करतील आणि आम्ही पण तेच केले, असे एकनाथ शिंदे म्हणाले.
पक्षाचा प्रमुख कुठलाही मनमानी निर्णय घेत असेल तर पक्षातील सहकारी विरोधात आवाज उठवतात. नेतृत्वाचे एकट्याचे मत म्हणजे पक्षमत असू शकत नाही..पक्ष एकट्याची मालमत्ता होऊ शकत नाही. उद्धव ठाकरेंना पक्षच समजत नाही, असा घणाघात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरेंवर केला.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
उद्धव ठाकरे यांनी नार्वेकरांचा निकाल लोकशाहीविरोधी असल्याचे म्हटले होते. त्यांच्या या विधानावर उद्धव ठाकरे यांनी 2019 ला आघाडीसोबत जाऊन लोकशाहीचा गळा घोटला, असे प्रत्युत्तर दिले. तसेच जे ज्यांच्यासोबत निवडणूक लढवली त्यांच्यासोबत न जाता विरोधकांसोबत सत्ता स्थापन केली ती चूक आम्ही सुधारली, असे शिंदे म्हणाले.
उद्धव ठाकरे यांनी या निकालावर संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. निकालाच्या आधी एकनाथ शिंदे आणि राहुल नार्वेकर भेटत असतील तर आम्ही काय समजायचे, असा सवाल उद्धव ठाकरे यांनी केला. तसेच ही मॅच फिक्स होती, असा आरोप केला. भरत गोगावले यांची प्रतोदपदी निवड योग्य मानून न्यायालयाचा अवमान केला आहे, असे ठाकरे म्हणाले. आपण निकालाविरोधात न्यायालयात जाणार असल्याचेदेखील ठाकरे यांनी स्पष्ट केले.
R...
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.