Shivsena VS BJP : सत्ताधारी भाजप-शिवसेनेत शाखेवरून जुंपली; कोण काय म्हणतंय ?

Sanjay Kelkar Vs Pratap Sarnaik : ती शाखा माझ्या नाहीतर केळकरा यांच्याच मतदारसंघात, कंटेनर शाखेवरून मित्रपक्षांतील वाद शिगेला
Sanjay Kelkar, Pratap Saranaik
Sanjay Kelkar, Pratap SaranaikSarkarnama

BJP Politics : महापालिकेच्या आरक्षित भूखंडावर उभारलेली शाखेवरून सत्ताधारी भाजप आणि शिवसेना या मित्र पक्षांत आता चांगलीच जुंपली आहे. भाजप आमदार संजय केळकरांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या नेत्याने कंटेनर शाखा अनधिकृतपणे उभारल्याचा आरोप केला होता. यानंतर शिंदे गटाचे आमदार प्रताप सरनाईकांनी केळकरांनी थेट निशाणा साधला.

घोडबंदर रोडवरील ती शाखा माझ्या नाही तर आमदार केळकरांच्याच मतदारसंघात आहे. आता ती शाखा हलवण्यात येणार आहे.तसेच कंटेनर शाखा अनधिकृत बांधकामाचा भाग होऊ शकत नाही, असे म्हणत सरनाईकांनी, केळकरांना डिवचले. यावरून सत्ताधारी मित्रपक्ष असलेल्या भाजप आणि शिवसेनेत ठाण्यातील कंटेनर शाखेवरून वाद उफळताना दिसत आहे.

Sanjay Kelkar, Pratap Saranaik
Maharashtra-Karnataka Border Dispute : मोठी बातमी! महाराष्ट्र-कर्नाटक सरकारला केंद्राची नोटीस; काय आहे कारण ?

आमदार केळकरांनी मंगळवारी महापालिका आयुक्तांची भेट घेत आरोप केल्यानंतर बुधवारी आमदार सरनाईकांनीही आयुक्तांची भेट घेतली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्या संदर्भात त्यांना छेडले. यावर त्यांनी आमदार केळकरांना डिवचण्याचा प्रयत्न केला. 'शिवसेनेच्या शाखांमधून सर्वसामान्यांची कामे होत असल्याने कंटेनर शाखा उभारण्यात आली आहे. परंतु ती महापालिकेच्या आरक्षित भुखंडावर असेल तर ती तेथून हलवण्यात येईल,' असे सरकाईकांनी स्पष्ट केले.

Sanjay Kelkar, Pratap Saranaik
Kalyan Dombivli News : लाखाचे 12 हजार भोवले! रजिस्ट्रार ठाणे ACBच्या जाळ्यात

'वास्तविक पाहता ही शाखा माझ्या मतदारसंघात नसून ती केळकर यांच्याच मतदार संघात आहे. त्यातही या शाखेमुळे आरक्षणाचा विकास रखडत असेल तर शाखा इतरत्र हलविण्यात येईल. तशा सूचना शिवसैनिकांना दिल्या जातील, असे सरनाईकांनी (Pratap Sarnaik) सांगितले.

'एखाद्या जागेत अनाधिकृत बांधकाम होण्यापेक्षा कंटनेर शाखा उभी राहत असेल आणि त्या माध्यमातून जनतेची सेवा केली जात असले तर त्यात चुकीचे असे काही नाही. परंतु या विषयाचा गाजावाजा करायची गरज नव्हती,' असा टोलाही त्यांनी केळकरांना लगावला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

केळकर (Sanjay Kelkar) हे अनधिकृत बांधकामावरून नेहमीच शिवसेनेला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न करतात. आता शिवसेना शाखेचा आयता मुद्दा त्यांच्या हातात आला आहे. यावर त्यांनी बोट ठेवत मित्र पक्ष असलेल्या शिवसेनेची अडचण करण्याचा प्रयत्न केला. यामुळे आता भाजप आणि शिवसेना सत्ताधारी पक्षामध्ये हा वाद शिगेला पोहचण्याची शक्यता राजकीय वर्तुळातून वर्तवली जात आहे.

(Edited by Sunil Dhumal)

Sanjay Kelkar, Pratap Saranaik
CM Hemant Soren News : घरावर रेड टाकणाऱ्या ‘ईडी’च्या अधिकाऱ्यांना सोरेन यांचा दणका  

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com