

Dombivli News महायुतीतील घटक पक्षातील एकमेंकांचे पदाधिकारी-कार्यकर्ते यांची फोडाफोडी थांबवा, असा निरोप दिल्लीतून आल्यानंतरही भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी या निरोपाला केराची टोपली दाखवली आहे.
रवींद्र चव्हाण यांनी पुन्हा शिवसेनचे नेते, उपमुख्यमंत्री एकानाथ शिंदे यांना धक्का दिला आहे. चव्हाणांनी डोबिंवलीमधील शिवसेनेचे दोन नेते फोडल्याने महायुतीत धूसफूस पुन्हा वाढली आहे.
शिवसेनेचे कल्याण ग्रामीण उपतालुकाप्रमुख विकास देसले आणि नेते सदानंद थरवळ यांचा मुलगा अभिजित थरवळ यांनी रविंद्र चव्हाण यांच्या उपस्थिती भाजपमध्ये प्रवेश केला आहे. या पक्षप्रवेशामुळे अस्वस्थ झालेल्या उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेच्या मंत्र्यांनी थेट मंत्रिमंडळाच्या बैठकीवर बहिष्कार टाकल्याची माहिती समोर येत आहे. या फुटाफुटीच्या राजकारणामुळे महायुतीत पुन्हा एकदा तणाव निर्माण झाला आहे.
नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकीची प्रक्रिया सुरु होतात महायुतीत एकमेकांचे पदाधिकारी- कार्यकर्ते यांची पळवापळवी सुरु आहे. हे सत्र अद्याप थांबलेले नाही.
विशेषता शिवसेना आणि एकनाथ शिंदे यांचा बालेकिल्ली असलेल्या ठाणे जिल्ह्यात शिवसेनेचे अनेक पदाधिकारी यांनी सेनेला जय महाराष्ट्र करीत भाजपमध्ये प्रवेश केला आहे. त्यामुळे स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत येथील राजकीय समीकरणे बदलणार आहेत.
एकनाथ शिंदे यांचे पदाधिकारी हे भाजपमध्ये प्रवेश केल्याने ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी महायुतीत तणाव देखील निर्माण झाला. एकनाथ शिंदेंची शिवेसना सोडून भाजपमध्ये प्रवेश करणाऱ्या माजी नगरसेविकेच्या पतीला उल्हासनगरमध्ये मारहाण झाल्याची घटना नुकतीत घडली.
ऐन निवडणुकीच्या तोडावर ठाणे परिसरात भाजप आणि शिवसेनेत एकमेकांचे कार्यकर्ते पदाधिकारी एकमेकांकडे खेचण्याची चढाओढ लागली आहे. त्यामुळे भाजप-शिवसेनेच्या स्थानिक नेत्यांमध्ये तणाव आहे. या तणावाचा उद्रेक हाणामारीत झाल्याचे काही ठिकाणी आपण पाहिले. निवडणूक जशी जवळ येईल तसे वातावरण अधिक चिघळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.