Pune Porsche Car Accident Case : 4 तास कसून चौकशी, 900 पानांचे चार्जशीट, पण आमदार टिंगरे यांचे आरोपपत्रात नाव नाही?

Pune Police Files 900 Pages Chargesheet : येरवडा तुरुंगात सुनिल टिंगरे काय करत होते? विशाल अग्रवालशी त्यांचा काय संबंध होता? असे अनेक प्रश्न टिंगरे यांना विचारले गेल्याची माहिती आहे.
Pune Porsche Car Accident Case news | NCP MLA Sunil Tingare
Pune Porsche Car Accident Case news | NCP MLA Sunil Tingare Sarkarnama
Published on
Updated on

Pune News : पुण्यातील पोर्शे कार अपघात प्रकरणात पुणे पोलिसांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांची चार तास कसून चौकशी केली होती. मात्र त्यानंतर पुणे पोलिसांनी कोर्टात दाखल केलेल्या चार्जशीटमध्ये सुनील टिंगरे यांचं नाव नसल्याचे समोर आले आहे.

पोर्शे अपघात प्रकरणाच्या निमित्ताने आमदार सुनील टिंगरे यांचे नाव सातत्याने चर्चेत होतं. अल्पवयीन आरोपीचे वडील आणि बांधकाम व्यवसायायिक अग्रवाल यांना मदत करण्याच्या हेतुने टिंगरे यांनी पोलिसांवर दबाव टाकल्याचा आरोप सातत्याने विरोधी पक्षाकडून करण्यात येत होता.

पुण्यातील कल्याणीनगर भागात एका अल्पवयीन मुलाने मध्यधुंद अवस्थेत बेदरकारपणे कार चालवत दोन तरुणांना उडवलं होतं, या अपघातात त्या दोघांचाही मृत्यू झाला होता. यानंतर वडगावशेरी विधानसभा मतदारसंघाचे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार सुनील टिंगरे यांनी पोलीस चौकीमध्ये येऊन आरोपीला मदत करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप देखील झाला होता. या संपूर्ण प्रकरणात त्यांची भूमिका आहे का, यावरूनही चर्चा सुरू होत्या.

Pune Porsche Car Accident Case news | NCP MLA Sunil Tingare
Sudhir Patil Join Shiv Sena: मराठवाड्यात CM शिंदेंचा फडणवीसांना दे धक्का; सुधीर पाटलांनी हाती घेतला 'धनुष्यबाण'

याप्रकरणांमध्ये पुणे पोलिसांच्या गुन्हे शाखेने आमदार सुनील टिंगरे यांची तीन ते चार तास चौकशी केली आहे. मात्र या चौकशीत सुनील टिंगरे यांनी काय जबाब दिला आहे, हे समोर आलेले नाही.

पुण्यातील येरवडा तुरुंगात सुनिल टिंगरे काय करत होते? विशाल अग्रवालशी त्यांचा काय संबंध होता? असे अनेक प्रश्न आमदार टिंगरे यांना विचारले गेल्याची माहिती आहे. मात्र आता याबाबत टिंगरे यांनी काय जबाब नोंदवला हे अद्याप गुलदस्त्यातच आहे.

या प्रकरणांमध्ये पोलिसांकडून न्यायालयात 900 पानांची पहिले चार्जशीट दाखल केले आहे. त्यामध्ये अल्पवयीन आरोपीच्या आईचे, वडिलांचे, आजोबांचे आणि ससून मधील डॉक्टरांची नावे आहेत. मात्र आमदार सुनील टिंगरे यांचं नाव नसल्याचे समोर आले आहे.

आतापर्यंत या प्रकरणांमध्ये 50 जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत. त्यामध्ये सुनील टिंगरे यांची देखील चार तास पोलिसांनी कसून चौकशी केली होती. त्यामुळे आरोपपत्रात सुनील टिंगरे यांचे नाव येणार का?

याबाबत चर्चा होती. मात्र पहिल्या आरोपपत्रात तरी टिंगरे यांच्या नावाच्या उल्लेख करण्यात आलेला नाही तरी देखील पुरवणी आरोपपत्रात त्यांचं नाव घेणार का हे पाहणे औचुक्याचे ठरणार आहे.

Edited by: Mangesh Mahale

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com