DRDO director Pradeep Kurulkar suspended: डीआरडीओ'चे संचालक प्रदीप कुरुळकर निलंबित

DRDO News | कुरुळकर यांनी चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे.
DRDO Officer Arrest In Pune : Pradip Kurulkar
DRDO Officer Arrest In Pune : Pradip KurulkarSarkarnama

DRDO director Pradeep Kurulkar Latest news : पुण्यातील संरक्षण संशोधन संस्थेचे (DRDO) संचालक प्रदीप कुरूळकरला निलंबित करण्यात आले आहे. पाकिस्तानला देशाच्या संरक्षणासंबंधी माहिती पुरवल्या प्रकरणी दोन दिवसांपुर्वी त्याला अटक करण्यात आली होती. यानंतर आज त्याच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. (DRDO director Pradeep Kurulkar suspended)

दरम्यान, कुरुळकर यांनी चौकशीत अनेक धक्कादायक खुलासे केल्याची माहिती तपास अधिकाऱ्यांनी दिली आहे. कुरुळकर हा देशाची संवेदनशील माहिती लीक करत असल्याचे सिद्ध झाल्यानंतर त्याला डीआरडीओच्या संचालक पदावरून हटवण्यात आले आहे. गुप्तचर यंत्रणांकडून त्याच्याविरुद्ध माहिती मिळाल्यानंतर डीआरडीओने तपास सुरू केला. या तपासात तो पाकिस्तानातील गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याचे आढळून आले . (National News)

DRDO Officer Arrest In Pune : Pradip Kurulkar
Pune ATS News : धक्कादायक! DRDO चे संचालक अडकले हनी ट्रॅपमध्ये, पाकिस्तानला पाठवली संवेदनशील माहिती?

कुरुलकर 2022 पासून पाकिस्तानी गुप्तहेरांच्या संपर्कात असल्याचे आढळून आल्यानंतर महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) अधिकृत गोपनीय कायद्यांतर्गत त्याला पुण्यातून अटक केली. एका महत्त्वाच्या पदावर असतानाही कुरुळकरने आपल्या पदाचा गैरवापर केला आणि संवेदनशील माहिती लीक करून देशाच्या सुरक्षेशी तडजोड केली. मुंबईतील एटीएसच्या काळाचौकी युनिटमध्ये अधिकृत गुप्तता कायद्याच्या संबंधित कलमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे. (Maharashtra Politics)

डीआरडीओ ही संस्था लष्कराच्या युद्धसाहित्य आणि तंत्रज्ञान विकसित करण्याचा काम करते. यामुळे ही सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय संवेदनशील संस्था आहे. याचे संचालक करूलकर हनी ट्रॅपमध्ये अडकले. त्याने व्हिडीओ चॅटच्या माध्यमातून आणि इतर सोशल मिडीयाचा माध्यमातून महत्त्वाची आणि संवेदनशील गुपितं माहिती पाकिस्तानला पुरवल्याचा संशय एटीएसला आहे. त्यामुळे मुंबईमध्ये त्यांच्याविरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्यानं तर आता त्यांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपाल आता पुणे एटीएसकडे सोपवण्यात आला आहे. (Pune News)

DRDO Officer Arrest In Pune : Pradip Kurulkar
NCP News : BJP मध्ये जाण्याचा विचार करणारे NCP मध्ये असू शकतात..; जयंत पाटलांचा रोख नेमका कुणाकडे ?

कुरूलकरने आपल्या पदाचा गैरवापर करत त्यांच्या कार्यक्षेत्रात येणारी संवेदनशील माहिती, शत्रूराष्ट्र पाकिस्तानला पुरवल्याचा संशय आहे. यानंतर दहशतवाद विरोधी पथकाने कारवाई करत त्यांनी अटक केली आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com