Siddhivinayak Temple Dress Code : मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात 'ड्रेसकोड' लागू करण्यामागचं नेमंक कारण काय?

Siddhivinayak Temple News : मंदिर प्रशासनाच्या म्हणण्यानुसार गुरुवारपासून भाविकांना ड्रेस कोड लागू झाला आहे.
Siddhivinayak Temple
Siddhivinayak TempleSarkarnama
Published on
Updated on

Mumbai Siddhivinayak Temple : मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिर व्यवस्थापनाने आता गणरायाच्या दर्शनासाठी मंदिरात येणाऱ्या भाविकांकरिता एक नवा नियम लागू करण्याच निर्णय घेतला आहे. मंदिर प्रशासनानुसार गुरुवार(30 जानेवारी)पासून मंदिरात येणाऱ्या भाविकांना ड्रेस कोड लागू झाला आहे. या नवीन नियमानुसार स्कर्ट, फाटके अन् उसवलेले कपडे किंवा अंग उघडे दिसेल असे कपडे घालून मंदिरात प्रवेश मिळणार नाही.

सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे कोषाध्यक्ष आचार्य पवन त्रिपाठी यांनी एका वेबसाइटशी बोलताना सांगितले की, मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात केवळ भारतातीलच नव्हे तर जगभरातील सनातनी आणि गणेशभक्तांसाठी श्रद्धेचे एक प्रमुख केंद्र आहे. या ठिकाणी लाखो भाविक दर्शनास येतात आणि येणाऱ्या भक्तांची मनोकामना पूर्ण होते. परंतु जेव्हा लोक एखाद्या पवित्र ठिकाणी जातात, तेव्हा काही नियमांचे पालन करणे आवश्यक असते, जेणेकरून त्या ठिकाणचे पावित्र्य टिकून राहील.

Siddhivinayak Temple
Ravindra Dhangekar News : पुण्यात काँग्रेसला लवकरच मोठा धक्का..? कसब्यातील पराभवानंतर नाराज धंगेकर मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत...

त्यांनी पुढे म्हटले की, हा निर्णय मंदिरात येणाऱ्या भक्तांच्या सूचनांच्या आधारावर घेतला गेला आहे. अनेक भक्तांनी मंदिरात दर्शन करताना, काही भाविकांनी घातलेल्या पोशाखावरून चिंता व्यक्त केली होती. ज्यांनी घातलेले कपडे नीटनेटके नसायचे. यावर विचार करत सिद्धिविनायक ट्रस्टने निर्णय घेतला की, दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना नीटनेटके कपडे घालावे लागतील. हा काही राजकारणाचा विषय नाही. हा एक धार्मिक आणि श्रद्धेशी निगडीत मुद्दा आहे.

जेव्हा लोक एखाद्या मंदिरात जातात, तेव्हा ते सामान्यत: आंघोळ करून, स्वच्छ आणि नीटनेटके कपडे घालून जातात. आमची हीच इच्छा आहे की, मंदिरात येणाऱ्या भाविकांनी पालन करावे. सर्व भाविकांपर्यंत हळूहळू या नियमाबाबत माहिती पोहचेल आणि ते नक्कीच याचे पालन करतील.

Siddhivinayak Temple
Mahayuti Infighting : महायुतीमध्ये गटबाजी; बीडपाठोपाठ रायगड, नाशिकमध्ये विरोधकांच्या तुलनेत सत्ताधाऱ्यांत चढाओढ!

तसेच आचार्य पवन त्रिपाठी यांनी हेही म्हटले की, देशभरात अनेक मंदिरांमध्ये ड्रेसकोड लागू आहे आणि तेथे जाणारे भाविक आधीपासूनच हे नियम जाणून असतात. आम्हाला विश्वास आहे की सिद्धिविनायक मंदिराचा हा नियमही कालानुरूप भाविक स्वीकारतील आणि त्याचे पालनही करतील. हा निर्णय केवळ सिद्धिविनायक मंदिराचे पावित्र्य आणि भक्तांच्या श्रद्धेचा विचार करून घेतला गेला आहे.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com