Durga Bhosle Shinde Death : युवासेनेच्या रणरागिणी दुर्गा भोसले-शिंदेंच्या अंत्यविधीसाठी ठाकरे कुटुंबीय दाखल !

Udhhav Thackeray And Family : मोर्चा दरम्यान दुर्गा यांना अस्वस्थ वाटत होतं
Durga Bhosle Shinde Death :
Durga Bhosle Shinde Death : Sarkarnama

Mumbai News : ठाण्यातील ठाकरे गटाच्या महिला पदाधिकारी रोशनी शिंदे यांच्यावरील हल्ल्याविरोधात महाविकास आघाडीच्या वतीने ठाण्यात जनप्रक्षोभ मोर्चा काढण्यात आला होता. या मोर्चादरम्यान ठाकरे गटासाठी एक दु:खद बातमी आली. युवासेनेच्या नेत्या व रणरागिणी अशी ओळख असणाऱ्या युवासेना सचिव दुर्गा भोसले-शिंदे यांचं हृदयविकाराच्या तीव्र धक्क्यानं निधन झालं आहे. दुर्गा भोसले यांच्या अंत्यविधीसाठी ठाकरे गट प्रमुख उद्धव ठाकरेंसह (Udhhav Thackeray And Family) संपूर्ण ठाकरे कुंटुबीय दाखल झाले.

युवासेनेच्या सचिव दुर्गा भोसले -शिंदे (Durga Bhosle Shinde)यांना ठाण्यातील महाविकास आघाडीच्या जनप्रक्षोभ मोर्चात चालत असतानाच अस्वस्थ वाटू लागले. त्यानंतर त्यांना तात्काळ मुंबईतील बॉम्बे हॉस्पिटल येथे उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनाची वार्ता समजताच युवासेना पदाधिकार, कार्यकर्ते यांच्यासह सर्वांनाचा मोठा धक्का बसला.

आदित्य ठाकरेंच्या अत्यंत विश्वासू म्हणून ओळख...

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या अत्यंत विश्वासू अशी दुर्गा भोसले - शिंदे यांची ओळख होती. युवा शिवसेनेच्या माध्यमातून राज्यभरात संघटनात्मक बांधणीत त्यांचा मोठा हातभार होता. त्यांच्या जाण्यानं ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याने हळहळ व्यक्त होत आहे. दुर्गा भोसले-शिंदे यांच्या पश्चात पती, आई, वडील आणि भाऊ असा परिवार आहे.

शिवसेना(ठाकरे गट) युवासेनेच्या कर्तृत्ववान महिला अशी दुर्गा भोसले यांची ओळख होती. दुर्गा भोसले या काल ठाण्यातील आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वात निघालेल्या जनआक्रोश मोर्चात देखील सहभागी झाल्या होत्या. मोर्चा दरम्यान उस्फुर्तपणे घोषणा देत त्या सहकारी शिवसैनिकांसोबत चालत होत्या.

आदित्य ठाकरे यांचं टि्वट ; म्हणाले, माझ्याकडे...

दुर्गा यांच्या निधनाच्या वृत्तानं मन सुन्नं झालं आहे. आमचा एक अत्यंत मेहनती आणि दयाळू युवासैनिक आम्ही आज गमावला आहे. युवासेना परिवाराला झालेला शोक व्यक्त करण्यासाठी माझ्याकडे शब्द नाहीत. ओम शांती' असं आदित्य ठाकरे यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे.

(Edited By Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com