Radhakrishna Vikhe Patil : मुंबईत अधिवेशन, पण विखे पिता-पुत्र दिल्लीत जाऊन अमित शाहांना भेटले; 'विषय दूध दरवाढीचा, पण टार्गेट विधानसभा!'

Milk Rate Issue : राज्यात दूध दरवाढीचा प्रश्न चिघळला आहे. विरोधी पक्षाने दूध दरवाढीसाठी पायऱ्यावर आंदोलन केले. याच दरम्यान केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची दुग्धविकास मंत्री राधाकृष्ण विखे यांनी भेट घेतली.
Sujay Vikhe Patil-Amit Shah- Radhakrishna Vikhe Patil
Sujay Vikhe Patil-Amit Shah- Radhakrishna Vikhe PatilSarkarnama
Published on
Updated on

Mumbai, 04 July : दुधाच्या वाढीव दरासाठी राज्यात विरोधक आक्रमक असताना राज्याचे महसूल तथा दुग्ध विकास मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांची भेट घेतली. या वेळी त्यांच्याबरोबर माजी खासदार सुजय विखेही होते. ऊस उत्पादक शेतकऱ्यांप्रमाणे दूध उत्पादकांना हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकारने ठोस पावले उचलावीत, असं साकडं मंत्री विखे यांनी सहकार मंत्री अमित शाह यांना घातले.

दूध दरवाढीसह इतर मुद्द्यांवरदेखील मंत्री अमित शाह (Amit Shah) यांच्याशी मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांची चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आणि विधानसभेत (Assembly Election) महायुतीचे (Mahayuti) काय भविष्य राहील, या संदर्भात या दोघा बड्या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी केंद्र सरकार सकारात्मक असल्याची ग्वाही केंद्रीय सहकार मंत्री अमित शाह यांनी मंत्री विखे यांना दिली. मंत्री राधाकृष्ण विखे आणि माजी खासदार डॉ. सुजय विखे पाटील यांनी केंद्रीय मंत्री अमित शाह यांची दिल्लीत भेट घेवून राज्यातील दूध उत्पादकांच्या प्रश्नाकडे लक्ष वेधले. या वेळी मंत्री विखे यांनी आजपर्यत महायुती सरकारने राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी घेतलेल्या निर्णयांची माहिती मंत्री शाह यांना दिली.

दूध उत्पादक शेतकऱ्यांना हमी भाव मिळावा, अशी अपेक्षा आहे. दूध उत्पादन व्यवसायावर ग्रामीण अर्थव्यवस्था अवलंबून असल्याने पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विकास मंत्रालयाच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहे. दुधाला हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकारने निर्णय केल्यास दूध उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळेल, असे मंत्री विखे यांनी बाजू मांडली.

Sujay Vikhe Patil-Amit Shah- Radhakrishna Vikhe Patil
Narsayya Adam : प्रणितींच्या मतदारसंघात आडम मास्तर लागले विधासभेच्या तयारीला; माकपचे ‘नोट भी दो, वोट भी दो’ अभियान

राज्य सरकारने सद्य परिस्थितीत दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेता मंत्री विखे यांनी दोन दिवसांपुर्वी दूध उत्पादक शेतकऱ्यांचे तसेच सहकारी व खासगी दूध संघाच्या प्रतिनिधीची बैठक घेवून दुधाला 30 रुपये स्थायीभाव व 5 रुपये सरकारी अनुदान, असा 35 रुपये दर देण्याचा निर्णय घेत, यापूर्वी तीन महिन्यांकरीता अनुदान दिल्याचे आवर्जून सांगितले.

दूध दरात होणारी चढउतार लक्षात घेवून हमीभाव देण्याबाबत केंद्र सरकारने विचार करण्याबाबत मंत्री विखे यांनी केलेली विनंती मान्य करून दुधाच्या हमी भावाबाबत राज्य सरकारने प्रस्ताव पाठविल्यास केंद्र सरकार निश्चित याबाबात सकारात्मक विचार करेल, अशी ग्वाही केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिली.

Edited By : Vijay Dudhale

Sujay Vikhe Patil-Amit Shah- Radhakrishna Vikhe Patil
Phulambri Assembly Constituency : कल्याण काळे खासदार झाल्याने फुलंब्रीत ‘भावी आमदारां’चे पीक वाढले उदंड!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com