Maharashtra Election Commission : सध्या राज्यात निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यातील सर्व पक्षांच्या वतीने लोकसभेच्या जागावाटपाबाबत बैठका पार पडल्या आहेत. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर प्रशासनानेही आतापासूनच तयारी सुरू केल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी प्रशासनाच्या वतीने शुक्रवारी (ता. २३ जून) एका कार्यशाळेचे आयोजन केले होते. त्या कार्यशाळेला काही अधिकारी गैरहजर होते. आता त्यांना नोटीस बजावण्यात आली आहे. (Latest Political News)
भारत निवडणूक आयोगाच्या आदेशाने राज्यातील अधिकाऱ्यांसाठी 'ईव्हीएम', 'व्हीव्हीपॅट'बाबत कार्यशाळेचे आयोजन केले होते. ही कार्यशाळा पुण्यातील यशदा येथे शुक्रवारी पार पाडली. या महत्त्वाच्या कार्यशाळेस सर्व जिल्हाधिकारी व जिल्हा निवडणूक अधिकारी व सर्व उपजिल्हा निवडणूक अधिकारी यांनी उपस्थित राहणे बंधनकारक होते. तसेच ज्या अधिकाऱ्यांना उपस्थित राहू शकणार नाहीत त्यांनी राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक होते. या कार्यशाळेसाठी भारतीय निवडणूक आयोगाने निरीक्षकाचीही नियुक्ती केली होती.
दरम्यान या कार्यशाळेस काही जिल्हाधिकारी, जिल्हा निवडणूक अधिकारी गैरहजर राहिले होते. यात सातारा, सोलापूर, लातूर, मुंबई शहर आणि अमरावती येथील अधिकाऱ्यांचा समावेश आहे. गैरहजर राहण्यापूर्वी त्यांनी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांची पूर्व परवानगी घेतली नव्हती. त्यामुळे आता त्यांना नोटीस पाठवून स्पष्टीकरण मागितले आहे. त्यांना २८ जून राजी सायंकाळी पाच वाजेपर्यंत स्पष्टीकरण देण्याचे बंधनकारक आहे.
ही नोटीस भारतीय निवडणूक आयोगाच्या वतीने पाठवण्यात आली आहे. त्यात म्हटले आहे की, "महत्त्वाच्या कार्यशाळेला तुम्ही गैरहजर राहिला होता. ही बाब आयोगाने अत्यंत गांभीर्याने घेतले आहे. कोणत्याही वैध कारणाशिवाय अशी गैरहजर राहणे आणि सक्षम अधिकाऱ्याकडून लेखी सूट देणे अत्यंत आक्षेपार्ह आहे. या कार्यशाळेतील तुमच्या अनुपस्थितीबाबत २८ जूनपर्यंत स्पष्टीकरण सादर करावे."
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.