Rohit Pawar on Ajit Pawar : '...पण तुम्ही कोणत्या 'धरणा'तून 'सिंचन' करून साम्राज्य उभं केलं?'

Baramati Argo : ईडीने कन्नड सहकारी साखर कारखान्याची जमीन जप्त करून बारामती अॅग्रो कंपनीला मोठा धक्का दिला आहे. प्रत्यक्षात ईडीची कारवाई बेकायदेशीर, निराधार आणि सूडापोटी आहे, असा दावा बारामती अॅग्रोने पत्रक काढून केला आहे.
Ajit Pawar, Rohit Pawar
Ajit Pawar, Rohit PawarSarkarnama
Published on
Updated on

Rohit Pawar News :

आमदार रोहित पवार यांच्या बारामती ॲग्रो कंपनीवर ईडीने (सक्तवसुली संचालनालय) त्यांची वक्रदृष्टी वळवली आहे. ईडीने मनी लाँर्ड्रिंग प्रकरणी बारामती अॅग्रोवर कारवाई सुरू केली आहे. आता तर बारामती ॲग्रो कंपनीशी संबंधित असलेल्या छत्रपती संभाजीनगरमधील कन्नड साखर कारखान्याची 161.30 एकर जमीन जप्त केली आहे. यामध्ये साखर कारखान्याची इमारत, जमीन, शुगर प्लांट यासह अन्य काही गोष्टींचा समावेश आहे. ही कारवाई म्हणजे लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर आमदार रोहित पवार आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मोठा धक्का मानला जात आहे.

Ajit Pawar, Rohit Pawar
ED Action On Rohit Pawar : आमदार रोहित पवारांना ईडीचा जोरदार दणका; कोट्यवधींच्या मालमत्तेवर टाच!

यंदा जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ईडीच्या (ED) अधिकाऱ्यांनी आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांच्या बारामती ॲग्रो कंपनीची तपासणी सुरू केली होती. त्यानंतर ही चौकशी सुरूच आहे. दरम्यान, आता ईडीने प्रिव्हेन्शन ऑफ मनी लाँर्डिंग (PMLA), 2002 कायद्यानुसार बारामती अॅग्रोवर कारवाई सुरू केली आहे. बारामती अॅग्रोने 50.20 कोटींमध्ये खरेदी केलेल्या कन्नड सहकारी साखर कारखान्याची 161 कोटींची मालमत्ता ईडीने (ED Action) जप्त केली आहे. यावरून बारामती अॅग्रोने प्रसिद्ध पत्रक काढून ईडीची कारवाई बेकायदेशीर असल्याचा आरोप केला आहे.

निराधार, बेकायदेशीर

कन्नड येथील साखर कारखान्याच्या (Kannad Sahakari Sakhar Karkhana) मालमत्तेवर ED ने प्रोव्हिजनल जप्ती आणल्याचा कुठलाही आदेश किंवा अधिकृत माहिती बारामती अॅग्रोला कळवण्यात आलेली नाही. ही कारवाई राजकीय सूडापोटी, निराधार आणि बेकायदेशीर आहे, असा आरोप बारामती अॅग्रोने केला आहे. त्यामुळेच शेतकरी आणि कामगारांनी निश्चिंत राहावे. कारण कारखाना आपल्याच मालकीचा आहे, तो बंद पडणार नाही. आपली बाजू सत्याची असल्याचे कोर्टात सिद्ध करू, अशी माहितीही देण्यात आली आहे.

तपासात काय आढळलं?

ईडीचा बारामती अॅग्रो लिमिटेड विरुद्ध सुरू असलेला तपास बेकायदेशीर आहे. मुंबईतील आर्थिक गुन्हे विभागाने दोनदा तपास करून सप्टेंबर 2020 आणि जानेवारी 2024 मध्ये फौजदारकी न्यायालयात 'सी समरी' म्हणजेच क्लोजर रिपोर्ट दाखल केला होता. ज्यात या प्रकरणात कोणताही गुन्हा घडलेला नाही, असा निष्कर्ष काढलेला आहे. तरीही ईडीने बेकायदेशीर प्रोव्हिजनल जप्ती केली आहे, असा दावा बारामती अॅग्रोने केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

घोटाळा झालाच कुठे?

महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने (Maharashtra State Co-operative Bank Ltd) 2009 आणि 2012 मध्ये कन्नड सरकारी साखर कारखान्याची मालमत्ता विक्रीची निविदा प्रसिद्ध केली होती. परंतु, त्याला प्रतिसाद मिळाला नाही. 30 जुलै 2012 रोजी पुन्हा निविदा प्रसिद्ध झाल्यानंतर बारामती अॅग्रोने त्यात सहभाग घेतला. ही निविदा प्रक्रिया महाराष्ट्र राज्य सहकारी बँकेने रिझर्व्ह बँकेच्या (RBI) आदेशानुसार राबवली. त्यामुळे गैरव्यवहाराचा प्रश्नच नाही, असा दावा बारामती अॅग्राेने केला आहे.

रोहित पवार यांचे ट्विट आणि टोलेबाजी

मी 800 किलोमीटरची संघर्षयात्रा काढली. 'यांनी काय संघर्ष केला?' माझा संघर्ष जगजाहीर आहे आणि व्यवसाय कसा उभा केला हे सांगण्याचं धाडसही माझ्यात आहे. पण तुम्ही कोणता संघर्ष करून आणि कोणत्या 'धरणा'तून 'सिंचन' करून साम्राज्य उभं केलं, हे सांगण्याची हिंमत तुमच्यात आहे का?, असा सवाल रोहित पवार यांनी नाव न घेता अजित पवार (Ajit Pawar) यांना विचारला आहे.

माझ्यावरील कारवाईवरून आज तुम्हाला व तुमच्या नवीन मित्राला गुदगुल्या होत असतील, पण लोकसभा निवडणुकीत जनताच तुम्हाला वाकुल्या दाखवल्याशिवाय राहणार नाही. त्याची झलक आत्ताच जागावाटपातही दिसायला लागलीय! हव्या त्या मंत्रिपदासाठी आणि तिकिटासाठी तुम्ही शंभर दिल्लीवाऱ्या कराल, पण महाराष्ट्राच्या प्रश्नांवर कधी दिल्लीत आवाज उठवलेला ऐकला नाही, असं नाव न घेता रोहित पवार यांनी अजित पवारांना टोला लगावला.

(Edited by Avinash Chandane)

R

Ajit Pawar, Rohit Pawar
ED against Rohit Pawar : रोहित पवार यांना ईडीचा पुन्हा दणका; म्हणाले, ‘भाजपाने लक्षात ठेवावं…’

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com