ईडी भाजपचे एटीएम मशिन : संजय राऊतांचा गंभीर आरोप

ही छापेमारी म्हणजे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे षडयंत्र आहे. जिथे जिथे शिवसेनेच्या शाखा आहेत, त्या ठिकाणी छापे पडत आहेत.
Sanjay Raut
Sanjay Raut sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : सक्तवसुली संचानलयाचे (ईडी) चार अधिकारी हे वसुलीचे काम करतात. त्यात भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांचा पाचवा नंबर आहे. ईडीचे काही अधिकारी हे भाजपचे तिकिट घेऊन निवडणूक लढवत आहेत, त्यामुळे ईडी आणि काही अधिकारी हे भाजपचे एटीएम मशिन बनले आहेत, असा गंभीर आरोप शिवसेनेचे खासदार संजय राऊत (sanjay raut) यांनी केला. (ED BJP's ATM machine: Sanjay Raut's serious allegations)

खासदार संजय राऊत यांनी आज (ता. ८ मार्च) शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी त्यांनी वरील आरोप केला. या वेळी त्यांच्यासोबत खासदार अरविंद सावंत उपस्थित होते.

Sanjay Raut
खुद्द शरद पवारच म्हणाले,‘इथेही पवारांचेच राज्य दिसतेय!’

जो पर्यंत मुंबई महापालिकेच्या निवडणुका होत नाहीत, तो पर्यंत केंद्रीय यंत्रणांना फक्त एकच काम असणार आहे. शिवसेनेच्या लोकांवर छापे टाका. देशातील सगळ्या लोकांच्या मनामध्ये शंका आहे की, महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालमध्येच छापे टाकले जात आहेत. केंद्रीय तपास यंत्रणांकडून पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्रातील ठरविक लोकांनाच टार्गेट केले जात आहे. ही छापेमारी म्हणजे महाविकास आघाडी सरकार पाडण्याचे षडयंत्र आहे. जिथे जिथे शिवसेनेच्या शाखा आहेत, त्या ठिकाणी छापे पडत आहेत. किरीट सोमय्या यांनी एका केंद्रीय मंत्र्याच्या बोगस कंपन्यांची यादी दिली आहे, त्याचे काय झाले, असा सवालही राऊत यांनी यावेळी उपस्थित केला.

Sanjay Raut
पडळकर तोंडघशी; 'ते' गोपनीय पत्रच निघालं बोगस

महाराष्ट्रात आतापर्यंत महाविकास आघाडीच्या अनेक नेत्यांवर कारवाई झाली. भाजप नेते काय रस्त्यावर हातात कटोरा घेऊन रस्त्यावर फिरत आहेत का. मी पूर्ण पुरावे देणार, महाराष्ट्रातील कोणत्या नेत्यांची बेनामी संपत्ती त्याच्याकडे आहे, हे मी पंतप्रधान यांना सांगणार आहे. सुमीतकुमार नरवाल या दूधवाल्याची संपत्ती चार वर्षांपर्यंत आठ हजार कोटींवर गेली आहे. त्याला पूर्वी राहायला घर नव्हते, तो आता मलबार हिलमध्ये राहत आहेत. ईडीने त्यांचा चष्मा बदलावा. भाजपच्या कोणत्या नेत्याचा पैसा त्याच्याकडे आहे, त्याबाबत मी प्रथम पंतप्रधान आणि ईडीला दिले जाणार आहे. ड्रायडन ग्रुपला कामं का मिळत होती. ईडीची ही भानामती मी लवकरच बाहेर काढणार आहे. माझ्यावर छापा टाकला किंवा अटक केली तरी मी घाबरणार नाही, असा इशाराही संजय राऊत यांनी केला.

ईडीच्या अधिकाऱ्याने उत्तर प्रदेशमधील भाजपच्या 50 उमेदवारांचा खर्च केला आहे. ईडी भाजपची पैश्यांची ATM मशीन बनली आहे. पंतप्रधान कार्यालयाला याबाबत पत्र देत मी कळवले आहे. ईडीचे एजेंट पैसे वसूल करत आहे, याची माहिती मी पंतप्रधान यांना दिली आहे. जितेंद्र चंद्रलाल नवलानी हा ईडीचा एजंट आहे. त्यांच्या 7 कंपन्या असून खंडणी वसूल केली गेली आहे. खंडणी वसूल केलेले पैसे हे नवलानीच्या कंपन्यांमध्ये टाकण्यात आले आहेत, असा दावाही राऊत यांनी केला आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com