शिवसेनेचे माजी खासदार आडसूळ अडचणीत; ईडीचे हजर राहण्याचे आदेश

अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या खोट्या जातपडताळणी प्रमाणपत्राचा आरोप केला होता.
Anandrao Adsul
Anandrao Adsul sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेच्या अनेक नेत्यांची ईडीच्या (ED) वतीने चौकशी सुरु आहे. आता ईडीने शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांना समन्स बजविण्यात आले आहे. सिटी सहकारी बँक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांच्यावर आरोप आहे. त्यामुळे अडसूळ यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (ED summons Anandrao Adsul)

सीटी बँकेमध्ये कामगार, पेंशनधारक, अशा लोकांची खाती होती. बॅंकेचे जवळपास ९ हजार खातेधारक होते. त्या खातेदारांचे पैसे अवैधरित्या बिल्डरांना वाटण्यात आले. त्यात अडसूळ यांनी २० टक्के कमिशन घेतले. त्यामुळे बँक बुडाली. यामध्ये जवळपास ९८० कोटींचा घोटाळा झाला, असल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. या प्रकरणात दोन वर्षांपूर्वी एफआयआर झाले आहेत. मुख्यमंत्री शिवसेनेचा असल्यामुळे ही चौकशी झाली नाही, असा आरोप आमदार रवी राणा यांनी केला आहे. त्यानंतर अडसूळ यांना ईडीने चौकशीला हजर राहण्या संदर्भात समन्स बजावले आहे.

Anandrao Adsul
अन् गृहमंत्र्यांनी भरसभेतच दिले पाबळच्या 'मनोरंजना'ची दखल घेण्याचे आदेश...!

दरम्यान, अडसूळ यांनी खासदार नवनीत राणा यांच्या खोट्या जातपडताळणी प्रमाणपत्राचा आरोप केला होता. उच्च न्यायालयाने देखील अडसूळ यांच्या बाजूने निकाल दिला होता. त्यानंतर राणा यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. सर्वोच्च न्यायालयात सुनावणी सुरू असतानाच ईडीकडून पहिले समन्स बजाविण्यात आले होते, असा आरोप अभिजीत अडसूळ यांनी केला. राणा दाम्पत्याचे वरपर्यंत संबंध आहे. त्यामुळे ईडीकडून चौकशी केली जात असल्याचा आरोप अभिजीत यांनी केला आहे.

Anandrao Adsul
'दादापेक्षा नाना मोठा' पटोलेंची जोरदार टोलेबाजी

आनंदराव अडसूळ यांनी आरोप फेटाळले

सीटी बँकेत ९८० कोटींचा घोटाळा झाल्याचा आरोप आनंदराव अडसूळ यांनी फेटाळून लावला आहे. बँकेत ८०० कोटींची उलाढाल होती. मग, ९८० कोटींचा घोटाळा कसा काय होऊ शकतो, असा सवाल त्यांनी केला. सकाळीच ईडीचे अधिकारी माझ्या घरी आले होते. त्यांनी मला चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिल्याचे अडसूळ यांनी सांगितले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com