नवाब मलिकांना आणखी एक धक्का: मुलगा फराज मलिक यांना इडीचे समन्स

Nawab Malik| Dawood Ibrahim| गुंड दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहारप्रकरणी त्यांना चौकशीसाठी बोलण्यात आल्याची शक्यता
Nawab Malik News Updates: Nawab Malik's Son on ED's Radar
Nawab Malik News Updates: Nawab Malik's Son on ED's Radar
Published on
Updated on

मुंबई: राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांचा मुलगा फराज मलिक यांना सक्तवसुली संचलनालयाने (ED) समन्स पाठवले आहे. फराझ मलिक आजच ईडी कार्यालयात येण्याची शक्यताही वर्तवण्यात येत आहे.

काय आहे प्रकरण?

कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याच्याशी आर्थिक व्यवहार केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि राज्य सरकारमधील मंत्री नबाव मलिक (Nawab Malik) यांना अटक करण्यात आली. गेल्या आठवड्यात ईडी अधिकाऱ्यांनी त्यांच्या घरावर छापा टाकत चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. त्यानंतर त्यांनी ईडीच्या कार्यालयात तब्बल ७ तास चौकशी केली. त्यानंतर त्यांना अटक करण्यात आली. त्यानंतर आता नवाब मलिक यांचा मुलगा फराझ मलिक यांनाही इडीने समन्स बजावले आहेत. (Nawab Malik's Son on ED's Radar)

Nawab Malik News Updates: Nawab Malik's Son on ED's Radar
राज्यपालांची उचलबांगडी करा, अन्यथा त्यांचे धोतर फेडणार!

नवाब मलिक यांनी दाऊदची बहीण हसीना पारकरकडून जमीन खरेदी केली होती. त्यावेळी या व्यवहारात फराझ मलिकही सहभाग होते. तर नवाब मलिक यांचे बंधू अस्लम मलिक आणि फराझ मलिक या व्यवहाराचे पैसे देण्यासाठी हसीना पारकरच्या घरी गेले होते. ५५ लाख रुपयांना हा जमिनीचा सौदा झाला होता. त्यासाठी फराझ मलिक यांनी हसीन पारकरला पाच लाख रुपयांचा धनादेश आणि ५० लाख रुपये रोख दिले होते. या व्यवहारावेळी हसीना पारकरचा सहकारी सलीम पटेलही उपस्थित होता. या पार्श्वभुमीवर माहिती घेण्यासाठी ईडीकडून फराझ मलिक यांची चौकशीचे समन्स बजावण्यात आल्याचे बोलले जात आहे.

दरम्यान, पीएमएलए न्यायालयाने नवाब मलिक यांना ३ मार्चपर्यंत इडी कोठडी सुनावली आहे. दाऊद कनेक्शन आणि आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी सध्या त्यांची कसून चौकशी सुरू आहे. मात्र, नवाब मलिक हे चौकशीत सहकार्य करत नसल्याच्याही काही बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे आता ईडी ३ मार्चला नवाब मलिक यांची कोठडी वाढणार की त्यांना दिलासा मिळणार हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com