भाजपच्या 'मराठी दांडिया' वरुन शिवसेनेचा टोमणा, मांसाहारावरुनही निशाणा

marathi dandiya : ''कमळाबाईचा आता मराठी दांडिया" असं म्हणत भाजपला शिवसेनेनं डिवचलं आहे.
Uddhav Thackeray
Uddhav Thackeray Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई: येत्या काही महिन्यात मुंबई पालिकेची निवडणूक अपेक्षित आहे. त्यामुळे नवरात्रोत्सवात मतदारांना खूष करण्यासाठी राजकीय पक्षांची चढाओढ सुरू आहे. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या वरळीत दहीहंडी उत्सवाचे आयोजन करून भाजपाने एकप्रकारे शिवसेनेवर (shivsena) कुरघोडी केली होती. त्याचाच दुसरा अंक नवरात्रोत्सवात बघायला मिळणार आहे. भाजपाने लालबाग परळमध्ये मराठी गाण्यांवरील आधारित मराठी दांडिया आयोजित केला आहे.(marathi dandiya news update)

मुंबईतील बहुतांशी गुजराती बहुल भागात गरबा-दांडियाचे मोठ्या प्रमाणावर आयोजन केले जाते. मात्र भाजपाने या कार्यक्रमातून मराठी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. यावरुन शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या 'सामना'मधून (Saamana Editorial) भाजपच्या 'मराठी दांडिया'वर (marathi dandiya event) जोरदार हल्लाबोल करण्यात आला आहे.

भारतीय जनता पार्टीच्यावतीनं मुंबईमध्ये 'मराठी दांडिया' कार्यक्रम आयोजीत करण्यात आला आहे. त्यावर आता सामनाच्या अग्रलेखातून टीका करण्यात आली आहे. ''कमळाबाईचा आता मराठी दांडिया" असं म्हणत भाजपला शिवसेनेनं डिवचलं आहे. जैन समाजानं मांसाहाराच्या जाहिरातीचा उठवलेल्या मुद्द्याला भाजप जबाबदार असल्याचं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Uddhav Thackeray
राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेत राष्ट्रवादी अन् शिवसेनाही सहभागी होणार ?

"लालबाग, परळ, माझगाव, शिवडी, दादर, भायखळा इतकेच काय, गिरगावपासून दहिसर-मुलुंडपर्यंतचा मुंबईतील प्रदेश सतत शिवसेनेच्या पाठीशी ठामपणे उभा राहिला व त्यात मराठीजनांबरोबर हिंदी, गुजराती, जैन, मारवाडी, मुस्लिम, दाक्षिणात्य असे ‘मुंबैकर’ बांधवही समर्थनार्थ उभे राहिले," असे अग्रलेखात म्हटलं आहे.

नवरात्र उत्सवात भाजप अनेक टिपऱ्या घुमवत आहे हे करून मराठी माणसाची एकजूट फोडता येईल हा त्यांचा भ्रम आहे. फक्त दांडिया करून शिवसेनेचे मुंबईवर राज्य टिकले नाही मुंबईवरील प्रत्येक घाव शिवसेनेने छातीवर झेलला आहे, असे शिवसेनेने म्हटलं आहे.

सामनाच्या अग्रलेखात म्हटलं आहे..

लालबाग, परळ, शिवडी या शतप्रतिशत भगव्या प्रदेशात कमळाबाईने खास मराठी दांडियाचे आयोजन करून मराठी मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न चालवला आहे. गणपती उत्सवानंतर नवरात्री उत्सवात भाजप आपल्या राजकीय टिपऱ्या अशा प्रकारे घुमवत आहे. अर्थात असे ‘दांडिये’ घुमवून मराठी माणसांची एकजूट फोडता येईल हा त्यांचा भ्रम आहे. मुंबईतील मराठी माणसांची एकजूट म्हणजे ‘मिंधे’ गटात सामील झालेल्या आमदारांची कमअस्सल अवलाद नाही.

''तर टी.व्ही. बंद करा''

मांसाहारी खाद्यपदार्थांच्या जाहिरातीवर बंदी घालण्याच्या मागणीसाठी काही जैन संघटना उच्च न्यायालयात गेल्या, पण तेथे न्यायालयाने त्यांची याचिका फेटाळून लावली. मांसाहारी खाद्य पदार्थांच्या जाहिराती पाहायच्या नसतील तर टी.व्ही. बंद करा असा फटका न्यायालयाने मारला. त्यावरुन शिवसेनेने नरेंद्र मोदींवरती टीका केली आहे. ''आपले पंतप्रधान श्री. मोदी यांनी आठ मांसाहारी चित्ते नामीबियातून आणले व मध्य प्रदेशच्या जंगलात वाजत-गाजत सोडले.

गोमांस भक्षणाचा महापूर

ते चित्ते काय जंगलात दही-खिचडी, तूप-रोटी खाणार आहेत? मोदींचे सरकार त्यांना चांगला मांसाहार पुरवत आहेत. हा काय मांसाहार, हिंसाचार नाही? भाजपशासित राज्यांत गोमांस भक्षणाचा महापूर आला आहे आणि इथे मुंबईतील अनेक भागांतील हाऊसिंग सोसायटय़ांत मांसाहारी मंडळींना ‘घर’बंदी आहे. मांसाहार करणाऱ्यांना घर आणि प्रवेश नाकारला जातो. मात्र या मांसाहार करणाऱ्यांनीच संकटांचे घाव झेलून मुंबईचे व त्यातील शाकाहारी व्यापार मंडळाचे रक्षण केले आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com