राज्यातील शाळा सुरू करण्याबाबत वर्षा गायकवाड यांची मोठी घोषणा

राज्यात बुधवारी कोरोनाचे सुमारे 43 हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत.
Students in School
Students in SchoolSarkarnama

मुंबई : राज्यात कोरोनाचे (Covid 19) रुग्ण वाढू लागल्याने पंधरा दिवसांपूर्वी बंद करण्यात आलेल्या शाळा पुन्हा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी याबाबतची घोषणा केली. शाळा सुरू करण्याच्या प्रस्तावाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी हिरवा कंदील दाखवल्यानंतर ही घोषणा करण्यात आली आहे.

गायकवाड यांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील सर्व शाळा (Schools) सोमवारपासून (ता. 24 जानेवारी) सुरू केल्या जाणार आहे. त्यामध्ये शिशुवर्गाचाही समावेश असेल. काही दिवसांपुर्वी पहिली ते बारावीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यात आल्या होत्या. शाळांबाबत स्थानिक प्रशासनाला अधिकार देण्यात आले आहेत. तसेच पालकांच्या संमतीशिवाय मुलांना शाळेत पाठवता येणार नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षेच्यादृष्टीने कोरोना नियमांचे पालन करून शाळा उघडल्या जातील, असंही गायकवाड यांनी स्पष्ट केलं आहे.

Students in School
माजी सरपंचाकडून गर्भवती वनरक्षक महिलेला लाथाबुक्क्यांनी मारहाण

महाविद्यालये उघडण्याचा निर्णय राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेतला जाणार असल्याची माहिती उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत (Uday Samant) यांनी दिली. दरम्यान, राज्यात ओमिक्रॉनची रुग्णसंख्या वाढू लागल्यानंतर आठ जानेवारीपासून शाळा व महाविद्यालये बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. नियमावलीनुसार 31 जानेवारीपर्यंत शाळा-महाविद्यालये बंद ठेवण्यात येणार होती. पण कोरोना रुग्णांचा आकडा आटोक्यात असल्याने पुन्हा वर्ग सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मागील दोन वर्षांपासून शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांच्या मानसिकतेवर विपरित परिणाम होत असल्याचा दावा शिक्षक, मानसोपचार तज्ज्ञांकडून केला जात आहे. ऑनलाईन शिक्षणामुळे अनेक मुलांची लिहिण्याची सवयही गेली आहे. अभ्यासावरही परिणाम होत असून मुलांना मोबाईलची सवय लागली आहे, असाही दावा केला जात आहे. त्यामुळे शाळा सुरू करण्याची मागणी केली जात होती.

महाराष्ट्र इंग्लिश स्कूल ट्रस्टी असोसिएशनने (MESTA) शाळा सुरू करण्याबाबत मुख्यमंत्री ठाकरे यांना नुकतंच पत्र लिहिलं होतं. या पत्रामध्ये त्यांनी शाळा बंद असल्याने विद्यार्थ्यांचे किती नुकसान होत आहे, याचा पाढाच वाचला आहे. शाळा सुरू न झाल्यास आंदोलन करण्याचा इशाराही संघटनेने दिला होता. यापार्श्वभूमीवर पुन्हा शाळा उघडणार आहेत. दरम्यान, राज्यात बुधवारी कोरोनाचे सुमारे 43 हजार नवे रुग्ण आढलून आले. तर 46 हजार रुग्ण बरे झाले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com