
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांना पुणे सत्र न्यायालयाने ड्रग्ज पार्टी प्रकरणात जामीन मंजूर केला.
माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी खेवलकर यांच्यावर खोटा गुन्हा दाखल करून अटक केल्याचा आरोप करत, ते न्यायालयात निर्दोष सुटतील असा विश्वास व्यक्त केला.
पोलिसांच्या छाप्यानंतर चार्जशीट दाखल झाले असून खेवलकर यांच्या ताब्यात कोणताही अंमली पदार्थ सापडला नसल्याचे वकिलांनी सांगितले.
Mumbai, 25 September : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष ॲड रोहिणी खडसे यांचे पती डॉ. प्रांजल खेवलकर यांना पुणे सत्र न्यायालयाने जामीन मंजूर केला आहे. पुण्यातील ड्रग्ज पार्टीप्रकरणी खेवलकर यांना दोन महिन्यांपूर्वी अटक करण्यात आली होती. जावई डॉ. खेवलकर यांना जामीन मंजूर होताच माजी मंत्री, आमदार एकनाथ खडसे यांनी मोठा दावा केला आहे.
आमदार खडसे म्हणाले, डॉ. प्रांजल खेवलकर (Dr. Pranjal Khewalkar) यांना आज जमीन मिळाला आहे. खेवलकर यांच्यासोबत या प्रकरणी अटकेत असलेल्या सर्वांना जामीन मिळालेला आहे. खेवलकर यांनी कुठलंही ड्रग्ज सेवन केलं नव्हतं किंवा जवळ बाळगलं नव्हतं. तरीही त्यांना अटक करण्यात आली होती.
डॉ. प्रांजल खेवलकर यांंनी रेव्ह पार्टी केल्याचे खोटं सांगण्यात आलं आणि त्यांना खोट्या गुन्ह्यात अडकवून अटक करण्यात आली. त्यांची ही केस जर पाहिली तर पोलिसांनी कुणाच्या तरी सांगण्यावरून हे कृत केल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणाचा खटला न्यायालयात चालेल आणि न्यायालयीन लढाईत डॉ. खेवलकर हे निर्दोष सुटतील, असा मला विश्वास आहे. असा दावा एकनाथ खडसे (Eknath Khadse) यांनी केला आहे.
महाराष्ट्राचे राजकारण किती खालच्या स्तरावर गेलेले आहे, याचे डॉ. प्रांजल खेवलकर यांनी झालेली अटक हे उत्तम उदाहरण आहे, असेही खडसे यांनी नमूद केले आहे.
खेवलकर यांना जामीन मिळताचा त्यांचे वकिल म्हणाले, कथित रेव्ह पार्टीचा तपास पूर्ण झालेला आहे. त्याचे चार्जशीट दाखल झालेले आहे. त्या सेक्शन ३७ एनडीबीएसचा बार नाही. क्वॉटिंटी ही इंटरमिजिएट आहे. हा जो कॉन्ट्राबॅंड (अंमली पदार्थ) जो होता, तो आमच्याकडून सीझ झालेला नाही.
खराडीतील एका प्लॅटमध्ये सुरू असलेल्या रेव्ह पार्टीवर पुणे पोलिसांनी 27 जुलै रोजी छापा टाकला होता. त्या पार्टीतून प्रांजल खेवलकरांसह इतर सात जणांना अटक करण्यात आली होती. त्या खोलीत 25 जुलै रोजीही ड्रग्ज पार्टी झाल्याचा दावा पोलिसांनी केला होता. मात्र, प्रांजल खेवलकर हे एकनाथ खडसे यांचे जावई आणि रोहिणी खडसे यांचे पती असल्यानं या प्रकरणाची राज्यात चर्चा झाली होती.
प्र: डॉ. प्रांजल खेवलकर यांना कोणत्या प्रकरणात अटक झाली होती?
उ: पुण्यातील कथित ड्रग्ज (रेव्ह) पार्टी प्रकरणात.
प्र: खेवलकर यांना जामीन कोणी मंजूर केला?
उ: पुणे सत्र न्यायालयाने.
प्र: एकनाथ खडसे यांनी या प्रकरणाबाबत काय आरोप केला?
उ: खेवलकर यांना राजकीय दबावामुळे खोट्या गुन्ह्यात अडकवले, असा दावा केला.
प्र: पोलिस तपासात खेवलकरांकडून ड्रग्ज सापडले का?
उ: नाही, त्यांच्या ताब्यात कोणताही अंमली पदार्थ मिळाला नाही.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.