CM Shinde, DCM Pawar : 'मिशन 45'साठी मुख्यमंत्री शिंदे अन् अजित पवारांचा किती फायदा?

BJP Mission 45 and MTON Survey : महाविकास आघाडी देणार महायुतीला धोबीपछाड
Eknath Shinde, Ajit Pawar
Eknath Shinde, Ajit PawarSarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Political News : भाजपने महाराष्ट्रात 'मिशन लोटस' राबवून आगामी लोकसभेत 'मिशन 45' ची तयारी सुरू केलेली आहे. शिवसेनेचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना बरोबर घेऊन राज्यात सत्तांतर केले. त्यानंतर पुरेसे संख्याबळ असतानाही राष्ट्रवादी फोडून उपमुख्यमंत्री अजित पवारांना सोबत घेतले. निवडणूक आयोगानेही शिंदे आणि अजित पवारांना साथ दिली. या पार्श्वभूमीवर लोकसभेसाठी आज मतदान झाले तर काय होईल, याचा अंदाज 'इंडिया टुडे आणि सी व्हाेटर'ने वर्तवला आहे. यात 'मिशन 45' साठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवारांचा (Ajit Pawar) फायदा होणार नसल्याचा अंदाज आहे.

महाराष्ट्रात लोकसभेच्या 48 जागा आहेत. गेल्या निवडणुकीत 2019 मध्ये एनडीएला एकूण 41 जागा मिळाल्या होत्या. त्यातील भाजपनेच तब्बल 23 जागा पटकावल्या होत्या, तर शिवसेनेला 18 मिळाल्या होत्या. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला एकूण पाच जागांवर समाधान मानावे लागले होते. एमआयएमने आणि अपक्षाने प्रत्येकी एक-एक जागा मिळवली होती. आता राज्यातील शिवसेना आणि राष्ट्रवादीत फूट पडली आहे. त्यामुळे आगामी लोकसभेत नक्की काय होणार, याबाबत देशात उत्सुकता आहे.

Eknath Shinde, Ajit Pawar
Loksabha Election 2024 : मोठी बातमी : भाजपच्या 'मिशन 45'ला सुरुंग; निवडणूकपूर्व सर्वेक्षणात महायुतीला महाधक्का

आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर 'इंडिया टुडे आणि सी व्हाेटर'ने महाराष्ट्राचा कल जाणून घेतला आहे. यात महायुतीला, महाविकास आघाडी धोबीपछाड देण्याची शक्यता असल्याचे समोर आले आहे. 'मिशन 45' साठी लढणाऱ्या महायुतीतील भाजपला 22 जागा मिळतील, तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या (Eknath Shinde) शिवसेना, राष्ट्रवादी (अजित पवार) यांना एकही जागा मिळणार नसल्याचे सर्वेक्षणात समोर आले. महायुतीला एकूण 40.5 टक्के मते मिळतील, असेही सांगण्यात आले आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

लोकसभेसाठी महाराष्ट्रात महाविकास आघाडीला भरभरून मते मिळण्याची शक्यताही या सर्वेक्षणात वर्तवली आहे. आघाडीला एकूण 44.5 टक्के मते मिळतील, तर शिवसेना (ठाकरे गट) 14, काँग्रेसला12 जागा मिळणार असल्याचे सर्वेक्षणात सांगितले आहे. दरम्यान, या सर्वेक्षणानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांनी आघाडीला तब्बल 35 जागा मिळण्याचा विश्वास व्यक्त केला आहे. तसेच या निवडणुकीला 'वंचित'चे प्रकाश आंबेडकरांना सोबत घेऊन सामोरे जाणार असल्याचेही स्पष्ट केले.

(Edited by Sunil Dhumal)

R

Eknath Shinde, Ajit Pawar
Shinde Vs Thackeray : शिंदे ठाकरेंना आणखी एक धक्का देणार अन् तोही मुंबईतच ! एक आमदार गळाला ?

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com