Eknath Shinde : महायुतीच्या ठाण्यातील उमेदवाराची आज घोषणा? शिंदेंच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला बड्या नेत्यांची मांदियाळी

Loksabha Election : ठाण्यातील ग्रँड सेन्ट्रल पार्क उद्यानाच्या लोकार्पणाचं निमित्त, दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री आणि अनेक आमदार आज ठाण्यात
Eknath Shinde
Eknath ShindeSarkarnama
Published on
Updated on

Thane Political News :

ठाण्यात आज ग्रँड सेन्ट्रल पार्क उद्यानाचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण होणार आहे. तब्बल 20.5 एकरवरील या उद्यानाच्या लोकार्पणासाठी दोन्ही उपमुख्यमंत्री, केंद्रीय मंत्री तसेच अनेक आमदार-खासदार येणार असल्याने ही ठाण्यातील लोकसभा निवडणुकीची नांदी समजली जाते. ठाण्यातील उमेदवारीचा महायुतीतील तिढा सुटलेला नसताना आज उद्यानाच्या लोकार्पणाच्या निमित्तानं महायुतीचे तिन्ही प्रमुख नेते एकत्र येणार आहेत. त्यामुळे लोकसभा उमेदवारीचे (Loksabha Election) संकेत मिळण्याची शक्यता आहे.

Eknath Shinde
Eknath Shinde: राष्ट्रवादी पक्ष अन् घड्याळ अजितदादांना; मुख्यमंत्री शिंदे शिवसेनेच्या निकालाचा संदर्भ देत म्हणाले...

रस्ता मुख्यमंत्र्यांसाठी

ठाण्यातील हे सर्वात मोठे उद्यान आहे. उद्या (शुक्रवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांचा वाढदिवस असल्यामुळे आदल्या दिवशी हा लोकार्पणाचा भव्य सोहळा होत आहे. विशेष म्हणजे या उद्यानाच्या प्रवेशद्वारावरील मुख्य रस्त्याचं काम अनेक महिन्यांपासून सुरू होतं. मात्र, मुख्यमंत्री उद्घाटन करणार म्हणून काही तासांत तात्पुरता रस्ता करून त्या रस्त्याला डांबरीकरणाचा साज चढवण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर झेब्रा क्रॉसिंगचे पट्टे देखील मारण्यात आले आहेत. मुख्यमंत्र्यांसाठी दुभाजक देखील चमकू लागले आहेत.

आता मुख्यमंत्र्यांसाठी केलेला डांबरीकरणाचा रस्ता पुन्हा उखडून तेथे सिमेंट काँक्रीटीकरणाचा रस्ता केला जाणार आहे. त्यामुळे ठाणेकरांचा कररुपी पैसा डांबरात वाया जाणार आहे, एवढं नक्की!

'ठाणेदारा'चे संकेत

ठाण्यातील लोकसभेच्या जागेवर शिवसेना (Shivsena), राष्ट्रवादी काँग्रेस (NCP) आणि भाजपकडून (BJP) दावा केला जात आहे. याबाबत चर्चा सुरू आहे. शिवाय महायुतीतील या तिन्ही पक्षांकडून उमेदवारांचीही चाचपणी सुरू आहे. त्यामुळे आजच्या लोकार्पण सोहळ्यात तिन्ही पक्षांचे मुख्य नेते उपस्थित राहणार असल्यामुळे लोकसभेतील ठाणेदार कुठल्या पक्षाच्या असेल त्याचे संकेत मिळण्याचे संकेत आहेत. शिवाय हा निव्वळ लोकार्पण सोहळा नसून मुख्यमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला होणारं महायुतीचं शक्तीप्रदर्शन देखील आहे, याकडे लक्ष वेधलं जात आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

मंत्री, नेत्यांची मांदियाळी

मुख्यमंत्री शिंदे यांच्या संकल्पनेतून उभारलेल्या या उद्यानाचे त्यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला लोकार्पण होणार आहे. या कार्यक्रमासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis), उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), केंद्रीय राज्य मंत्री कपिल पाटील, ठाण्याचे पालकमंत्री शंभूराज देसाई, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण हे विशेष अतिथी आहेत. याशिवाय ठाण्याचे ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे, कल्याणचे खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, खासदार कुमार केतकर, डॉ. जितेंद्र आव्हाड, प्रताप सरनाईक, संजय केळकर, निरंजन डावखरे, प्रमोद पाटील या आमदार मंडळींची विशेष उपस्थिती असणार आहे.

(Edited by Avinash Chandane)

Eknath Shinde
Jitendra Awhad News : 'तुम्ही हातातलं घड्याळ चोरलं, पण मनगट आमच्याकडेच' ; आव्हाडांकडून अजित पवार लक्ष्य!

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com