Shinde group Politics| Dynasticism|
Shinde group Politics| Dynasticism|

एकनाथ शिंदेंनीही जोपासली घराणेशाही : आडसुळांच्या मुलावर सोपवली मोठी जबाबदारी!

Shinde group Politics| Dynasticism| शिंदे गटाने नुकतीच युवासेनेची नवी कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये शिंदे गटातील वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांच्या मुलांना मोठी पदे देण्यात आली आहेत.

मुंबई : माजी खासदार आनंदराव अडसूळ यांचे पुत्र कॅप्टन अभिजीत अडसूळ यांची शिंदे गटाच्या सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी अभिजीत अडसूळ यांना नियुक्तीचे पत्र दिले. यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंतही उपस्थित होते. अभिजीत अडसूळ हे यापूर्वी आमदार विभागप्रमुख होते. असे असतानाच आता अभिजीत अडसूळ यांच्या नियुक्तीनंतर शिंदे गटात आणखी एका घराणेशाहीचे उदाहण दिसून आल आहे.

आनंदराव अडसूळ हे शिवसेनेचे माजी खासदार आणि सध्याचे शिंदे गटाचे नेते आहेत.अडसूळ हे शिवसेनेकडून तब्बल 5 वेळा खासदार राहिले आहेत. पण तीन महिन्यांपूर्वी एकनाथ शिंदेंनी बंडखोरी केली. ४० आमदार आणि काही खासदार गळाला लावले. राज्यात शिंदे-फडणवीस सरकार स्थापन झाले. मुख्यमंत्री शिंदेंनी बंडखोरीनंतर आमदार खासदारांसह शिवसेनेवरही दावा केला. इतकेच नव्हे तर काही दिवसांतच त्यांनी शिवसेनेची राष्ट्रीय कार्यकारिणी बरखास्त करून स्वत:ची नवी कार्यकारिणीही जाहीर केली. त्यांनी आनंदराव अडसूळ यांची पक्षाच्या नेतेपदी नियुक्ती केली.

Shinde group Politics| Dynasticism|
Nilesh Lanke : कार्यकर्ता हीच माझी ताकद...

- शिंदे गटाच्या युवासेनेतील 'घराणेशाही'

शिंदे गटाने नुकतीच युवासेनेची नवी कार्यकारिणी जाहीर केली. यामध्ये शिंदे गटातील वरिष्ठ नेते आणि मंत्र्यांच्या मुलांना मोठी पदे देण्यात आली आहेत. त्यामुळे शिंदे गटातही घराणेशाहीचं दर्शन घडत आहे. शिंदे गटाच्या प्रवक्त्यांनी जाहीर केलेल्या यादीनुसार, शिंदे गटाच्या नव्या कार्यकारणीत सर्वसामान्य तरुणांपेक्षा आमदारांच्या चिरंजींवांनाच स्थान दिल्याचं दिसून येत आहे.

शिंदे गटाच्या युवा सेनेच्या नव्या कार्यकारिणीत ठाणे, नवी मुंबई व पालघरमधून मनीत चौगुले, राहुल लोंढे, नितीन लांडगे, विराज म्हामूणकर आणि मुंबईतून राज सुर्वे, प्रयाग लांडे, समाधान सरवणकर, राज कुलकर्णी यांना तर विदर्भातून विठ्ठल सरप-पाटील आणि ऋषी जाधव संधी देण्यात आली आहे.

याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातून किरण साळी, सचिन बांगर, कल्याण-भिवंडीतून दीपेश म्हात्रे, प्रभुदास नाईक, उत्तर महाराष्ट्रातून आविष्कार भुसे, मराठवाडय़ातून अभिमन्यू खोतकर, अविनाश खापे-पाटील, कोकण पट्टय़ात रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गमधून विकास गोगावले, रुपेश पाटील, राम राणे यांना कार्यकारिणीवर घेण्यात आले आहे. शिंदे गटाच्या युवासेनेची ही कार्यकारिणी पाहता शिंदेंच्या युवासेनातही घराणेशाहीला सुरुवात झाल्याची प्रतिक्रिया सोशल मिडीयावर उमटत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com