Eknath Shinde And Ajit Pawar: मुख्यमंत्र्यांना मदत की...; अजितदादांनी पत्रकार परिषदेतच शिंदेंना लिहून दिली चिठ्ठी; चर्चांना उधाण

Maharashtra Assembly Monsoon Session 2024 : गेल्या काही दिवसांत घडलेल्या पेपरफुटी,पुणे ड्रग्ज प्रकरण, कोयता गँग, इतर गुन्हेगारीच्या वाढत्या घटनांसह विविध प्रकरणांमुळे विरोधक अधिवेशनात सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्यासाठी तयार आहे.
Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar, Eknath Shindesarkarnama

Mumbai News : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन गुरुवारपासून(ता.27) सुरू होत आहे.या अधिवेशनात लोकसभा निवडणुकीच्या निकालाने आत्मविश्वास दुणावलेले विरोधक सत्ताधारी महायुती सरकारवर तुटून पडण्याची चिन्हे आहेत.तर विरोधकांची प्रत्येक डाव उलथवून टाकण्यासाठी शिंदे-फडणवीस-पवार सरकारनेही जोरदार तयारी केली आहे.

या अधिवेशनाआधी झालेल्या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे सरकारची बाजू मांडत असतानाच शेजारी बसलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवारांनी त्यांना चिठ्ठी लिहून दिली. आता या चिठ्ठीत नेमकं काय लिहिलं होतं यावरुन तर्क-वितर्क लावण्यास सुरुवात झाली आहे.

गेल्या काही दिवसांत घडलेल्या पेपरफुटी,पोर्शे कार अपघात,पुणे ड्रग्ज प्रकरण,कोयता गँग,आणि इतर गुन्हेगारीच्या वाढत्या घटना,यांसारख्या विविध प्रकरणांमुळे विरोधक अधिवेशनात सत्ताधारी पक्षाची कोंडी करण्यासाठी तयार आहे.यातच लोकसभा निवडणुकीतील अपयशानंतर होत असलेल्या या अधिवेशनात महायुती सरकारची भिस्त मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) , उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवारांवरच आहे.या तीनही नेत्यांचा कस विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनात लागण्याची शक्यता आहे.

याआधी अनेकदा मुख्यमंत्री पत्रकार परिषदेत बोलताना त्यांच्या मदतीकरिता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे धावून आल्याचे पाहायला मिळाले होते.पण एकीकडे महायुतीत लोकसभेतील निराशाजनक कामगिरीनंतर खटके उडत असतानाच दुसरीकडे चक्क मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मदतीला उपमुख्यमंत्री अजित पवार धावले. त्यांनी पत्रकार परिषदेमध्येच मुख्यमंत्री शिंदेनाच चिठ्ठी लिहून दिली.त्यामुळे उपस्थितांच्या भुवया उंचावल्या.या चिठ्ठीत नेमकं काय होतं यावरुन आता चर्चांना उधाण आले आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde
Kapil Patil News: नेहमीच सरकारवर तुटून पडणाऱ्या कपिल पाटलांची आज चक्क चहापानाला हजेरी; त्यांनीच सांगितले कारण..

पावसाळी अधिवेशनात सत्ताधारी महायुतीला घेरण्यासाठी विरोधकांनी मोठी तयार केली आहे. याच पार्श्वभूमीवरच विरोधकांनी सत्ताधारी पक्षाच्या चहापानावर बहिष्कार टाकला आहे.तसेच सरकारला प्रश्नांची सरबत्ती करणारं निवेदनही दिले आहे.त्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) पावसाळी अधिवेशनाआधीच विरोधकांवर हल्लाबोल केला आहे.

Ajit Pawar, Eknath Shinde
Ajit Pawar News: पावसाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येलाच अजित पवारांचा विरोधकांवर गंभीर आरोप;म्हणाले,'खोटा नरेटिव्ह..'

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com