Eknath Shinde : मुख्यमंत्री शिंदे यांचं पुन्हा ठाकरेंवर टीकास्र; म्हणाले, माझे नव्हे तुमचे कुटुंब...

Uddhav Thackeray : कोरोना काळात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माझे कुटुंब माझी जबाबदारी अशी घोषणा देत कुटुंबाच्या सुरक्षेबाबत अनेक सूचना केल्या होत्या. पण त्यांची सत्ता गेल्यानंतर याच घोषणेवरून एकनाथ शिंदे नेहमी ठाकरेंवर टीका करत असतात
Uddhav Thackeray Eknath Shinde
Uddhav Thackeray Eknath Shindesarkarnama
Published on
Updated on

Thane News :

सध्या लोकसभा निवडणुकीचा माहोल आहे. त्यामुळे संधी मिळाली की कुणीही विरोधकांवर टीका करण्याची संधी सोडत नाही. त्यातच कार्यक्रम ठाण्यात असेल, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित असतील तर उद्धव ठाकरेंवर टीकेचे बाण चालणारच. आजही तसेच घडले. कोपरीतील संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधिनीच्या उद्घाटनप्रसंगी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पुन्हा एकदा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना 'माझे कुटुंब माझी जबाबदारी'वरून डिवचले. याला अद्याप ठाकरे गटाने प्रत्युत्तर दिलेले नाही.

Uddhav Thackeray Eknath Shinde
Sanjay Kelkar : ठाण्यात चाललंय तरी काय? मुख्यमंत्र्यांच्या खात्यातील 100 कर्मचारी करतात 400 कर्मचाऱ्यांचे काम

ठाण्यात महिन्याला दोन हजार तरुणांना चार विविध भाषांचे प्रशिक्षण आणि रोजगार उपलब्धतेविषयी प्रशिक्षण दिले जाणार आहे. या संदर्भात ठाण्यातील कोपरी येथे उभारण्यात आलेल्या संत गाडगेबाबा स्वच्छ भारत कौशल्य प्रबोधनीचे त्यांनी उद्घाटन केले. 'यापूर्वीदेखील स्कील डेव्हलपमेंट काढण्यात आले होते, पण ते किती चालले याविषयी मला बोलायचे नाही. मात्र या स्कील डेव्हलपमेंटच्या माध्यमातून तुमच्या याद्या कमी पडतील मात्र स्कील डेव्हलपमेंट कमी पडणार नाही, असे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले. त्याचवेळी 'माझे कुटुंब माझी जबाबदारी' नाही तर 'तुमचे कुटुंब माझी जबाबदारी' असे म्हणत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांच्यावर टीका केली.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाची संत गाडगे बाबा स्वच्छ भारत स्किल अकॅडमीद्वारे विविध प्रकारचे प्रमाणपत्रे आणि पदवी अभ्यासक्रम ठाण्यात उपलब्ध करून दिले जातात. या अभ्यासक्रमाची रचना उद्योगक्षेत्राच्या बदलत्या गरज लक्षात घेऊन करण्यात आली असून, नोकरीसाठी आवश्यक प्रशिक्षणाचा यात समावेश आहे. येथे मॅकेनाईज्ड हाउसकीपिंग, फ्रंट ऑफिस सेवा, इमारत देखभाल आणि सुरक्षा, फलोत्पादन, संभाषण कौशल्य इत्यादी अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

(Edited by Avinash Chandane)

R

Uddhav Thackeray Eknath Shinde
Thane Municipal Corporation : मुख्यमंत्र्यांच्या ठाण्यात ऐकावं ते नवलच; महापालिका मुख्यालयातून 'ती' महत्त्वाची नोंदवही गायब

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com