अजित पवार शिंदे-फडणवीसांच्या टीमचा भाग; तिघेही महाराष्ट्राची शान वाढवतील : केसरकर

Ajit Pawar | NCP | Shivsena| BJP : दिलदार मनुष्य म्हणून अजितदादांची ओळख...
Devendra Fadnavis | Eknath Shinde | Ajit Pawar
Devendra Fadnavis | Eknath Shinde | Ajit Pawar Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : विश्वासदर्शक ठराव मंजूर झाल्यानंतर या सरकारला पहिल्याच दिवशी कोणची आठवण आली असले तर ती महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेची. त्यामुळेच पेट्रोल-डिझेलवरील व्हॅट कमी करण्याचा निर्णय झाला. कॅबिनेटची बैठक झाल्यानंतर तो निर्णय प्रत्यक्षात अंमलात आणला जाईल. पेट्रोल-डिझेलच्या किंमती वाढल्यानंतर काय होते ते सर्वसामान्य माणसांत राहिल्यानंतर, त्यातून आल्यानंतर दुःख कळतं. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना न्याय देतील, असा विश्वास शिवसेना (शिंदे गटाचे) प्रवक्ते दिपक केसरकर यांनी व्यक्त केला. ते आज संध्याकाळी श्री सिद्धीविनायक दर्शनला आल्यानंतर बोलत होते.

अजित पवार शिंदे-फडणवीसांच्या टीमचा भाग

दिपक केसरकर म्हणाले, शिंदे यांना फडणवीस यांच्यासारख्या ज्यांना अत्यंत बुद्धीमान म्हणून ओळखल जातं, त्यांच्या कल्पक नेतृत्वाची साथ मिळाली आहे. त्यासोबत आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे अजित पवारांसारखा अत्यंत दिलदार मनाचा विरोधी पक्ष नेता महाराष्ट्राला लाभला आहे. अजितदादांची ओळख दिलदार मनुष्य म्हणूनच आहे. कोणतेही काम करताना या कामाला कसे सहकार्य करायचे हे त्यांना माहित आहे. त्यामुळे या तिघांची महाराष्ट्र टीमही मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्राची शान वाढवेल. देवाचे आशीर्वाद या टीमला मिळो, असेही केसरकर म्हणाले.

द्रौपदी मुर्मू यांना आमचा पाठिंबा :

पुढे बोलताना केसरकर म्हणाले, काल आमची एक मिटिंग झाली. त्याला एकनाथ शिंदे व्हीसीद्वारे उपस्थित होते. यावेळी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्याशी बोलणं झालं. राष्ट्रपती पदाच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू १४ तारखेला मुंबईत येणार आहेत. आम्ही त्यांना समर्थन दिले आहे. ही एका पक्षाची निवडणूक नाही. त्यामुळे सर्वांनी एकत्र यावे आणि मतदान करावे. आदिवासी प्रतिनिधींना प्रतिनिधित्व हा देश देत असतो, असेही ते म्हणाले.

महापूरावर सरकार लक्ष ठेवून आहे :

राज्यात एका बाजूला काही भागात मुसळधार पाऊस कोसळतं आहे, आणि दुसऱ्या बाजूला सरकारने अद्याप मंत्रिमंडळाची स्थापना केलेली नाही, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसकडून होत आहे. यावर बोलताना केसरकर म्हणाले, सरकार पावसावर लक्ष्य ठेवून आहे. मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची कॅबिनेट अस्तित्वात आहे. मुख्यमंत्री आपत्ती व्यवस्थापनच्या संपर्कात आहेत. काल संध्याकाळी देवेंद्र फडणवीस हे रायगडच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत बोलले आणि त्यानंतर त्यांनी प्रविण दरेकर यांना रायगडमध्ये पाठवले आहे. त्यामुळे हे आरोप पूर्णपणे चुकीचे आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com