Eknath Shinde And Deepak Kesarkar
Eknath Shinde And Deepak KesarkarSarkarnama

Eknath Shinde On Deepak Kesarkar : 'घोषणा नको कृती करा...', CM शिंदेंकडून केसरकरांना समज; नेमकं प्रकरण काय?

Eknath Shinde And Deepak Kesarkar : एकीकडे महायुती सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. मात्र, दुसरीकडे बदलापूर प्रकरणामुळे मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.
Published on

Mumbai News, 29 August : शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यभरात सरकारची प्रतिमा मलिन होत असून केवळ कारवाईच्या घोषणा नको, कृती करा, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिक्षणमंत्री दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांना समज दिल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

बदलापुरमधील लैंगिक अत्याच्याराच्या घटनेमुळे राज्यभरात सरकारच्या प्रतिमेला धक्का पोहचला आहे. शाळांमधील गैरकारभार देखील बदलापूर प्रकरणामुळे चव्हाट्यावर आला आहे. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी लावलेले सीसीटीव्ही फूटेज गायब झाल्यामुळे सरकारच्या भोंगळ कारभारावर तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे.

अशातच रविवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत शिक्षण विभागाच्या कारभारावरुन मंत्रिमंडळाने तीव्र नाराजी व्यक्त केल्याची माहिती आहे. तर यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी "शिक्षण विभागाच्या अनास्थेमुळे राज्यभरात सरकारची प्रतिमा मलिन होत असून केवळ कारवाईच्या घोषणा नको, कृती करा, शाळांमध्ये मुलींच्या रक्षणासाठी कठोर उपाययोजना करा," अशा शब्दांत शिक्षणमंत्र्यांना समज दिल्याची माहिती समोर येत आहे.

Eknath Shinde And Deepak Kesarkar
Beed News: जनसन्मान यात्रा येण्यापूर्वीच झळकले काळ्या रंगाचे बॅनर; बीडकरांनी विचारला अजितदादांना जाब

एककीकडे महायुती सरकार मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून आपली चांगली प्रतिमा निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. यासाठी राज्यभरात वचनपूर्ती कार्यक्रम आयोजित केले जात आहेत. मात्र, दुसरीकडे बदलापूर (Badlpaur) प्रकरणामुळे मुलींच्या आणि महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे.

अशातच बदलापुरातील शाळेतील मागील 15 दिवसांचे सीसीटीव्ही (CCTV) फुटेज गायब झाले आहे. ही बाब शिक्षण विभागाच्या चौकशी समितीतून उघडकीस आल्याची माहिती मंत्री दिपक केसरकर यांनी दिली.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com