Maharashtra Cabinet Meeting : नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळाबद्दल मंत्रिमंडळ बैठकीत मोठा निर्णय

Shinde Govt Cabinet Meeting : महसूल, उच्च आणि तंत्र शिक्षण, सहकार, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम आणि उर्जा विभागासंदर्भातही मंत्रिमंडळात बैठकीत निर्णय घेण्यात आले आहेत.
ajit pawar | devendra fadnavis | eknath shinde
ajit pawar | devendra fadnavis | eknath shindesarkarnama
Published on
Updated on

Maharashtra Politics : लोकसभेचा जिव्हारी लागलेला पराभव आणि विधानसभेच्या पार्श्वभूमीवर महायुती सरकारकडून खटाखट निर्णय घेतले जात आहे. मंगळवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार ( Ajit Pawar ) यांच्या उपस्थितीत मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत आठ मोठे निर्णय घेण्यात आले.

मंत्रिमंडळ बैठकीत विदर्भ आणि मराठवाड्यातील दूध उत्पादकांसाठी मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यासह नगराध्यक्षपदाच्या कालावधीबाबतही महत्त्वाचा निर्णय घेण्यात आला आहे. महसूल, उच्च आणि तंत्र शिक्षण, सहकार, वैद्यकीय शिक्षण, सार्वजनिक बांधकाम आणि उर्जा विभागासंदर्भातही मंत्रिमंडळात बैठकीत निर्णय घेण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीतील निर्णय काय?

  • विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देण्यासाठी 149 कोटीस मान्यता (पशूसंवर्धन व दुग्धविकास)

  • मराठवाड्यातील खालसा झालेल्या वर्ग दोनच्या इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग एक करण्याचा निर्णय. याचा लाखो नागरिकांना लाभ मिळणार आहे. ( महसूल विभाग)

  • डेक्कन कॉलेज, गोखले अर्थशास्त्र व राज्यशास्त्र संस्था, टिळक महाराष्ट्र विद्यापीठातील शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांना वैद्यकीय प्रतिपूर्ती योजना (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)

  • यंत्रमागांना अतिरिक्त वीजदर सवलतीसाठी नोंदणीची अट मार्च 2025 पर्यंत शिथील ( सहकार विभाग)

  • शासकीय, खासगी वैद्यकीय महाविद्यालयाच्या निवृत्त अध्यापाकाना ठोक मानधन ( वैद्यकीय शिक्षण विभाग)

  • सहा हजार किमी रस्त्यांचे डांबरीकरणाऐवजी सिमेंट काँक्रीटीकरण. सुधारित ३७ हजार कोटी खर्चास मान्यता ( सार्वजनिक बांधकाम विभाग)

  • नगराध्यक्षांचा कालावधी अडीच ऐवजी पाच वर्ष ( नगरविकास विभाग)

  • सौर ऊर्जा प्रकल्पांच्या कर्जासाठी केएफ डब्ल्यू कंपनीशी स्थिर व्याजदराने करार ( ऊर्जा विभाग)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com