Mumbai Political News : विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम कधीही जाहीर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे राज्यातील राजकारणात दररोज नवनव्या घडामोडी घडत आहेत. त्यातच सर्वपक्षाच्या दिल्लीवाऱ्याही सुरू झाल्या आहेत. यावरून आरोप-प्रत्यारोपही होत आहेत.
सध्या पावसाने राज्यातील अनेक शहरांतील नागरिकांना पूरचा फटका बसला आहे. पुण्यातील पूरग्रस्तांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वतः भेट घेऊन प्रशासनाला योग्य त्या सूचना केल्या आहेत. त्यातच माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार आहेत. त्यावरून शिंदे गटाने ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
एकीकडे शिवसेनेच्या ठाकरे गटाकडून एकनाथ शिंदे Eknath Shinde यांच्यावर सातत्याने दिल्लीवाऱ्या करत असल्याचा आरोप केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवारी दिल्लीत इंडिया आघाडीच्या बैठकीसाठी गेलेल्या उद्धव ठाकरेंवर शिवसेनेच्या वतीने व्यंगचित्राच्या माध्यमातून टीका केली आहे.
एकनाथ शिंदे सोमवारी पुण्यातील पूरग्रस्तांच्या मदतीसाठी गेले असताना उद्धव ठाकरे दिल्लीत इंडीया आघाडीच्या बैठकीसाठी जात असल्याच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरेंचा समाचार व्यंगचित्रातून घेतला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या दिल्ली दौऱ्यावरून शिवसेना ठाकरे गटाकडून वारंवार टीका होत असते. आता मात्र उद्धव ठाकरे यांच्या सहकुटुंब तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर गेल्याने शिवसेना पक्षानेही जोरदार पलटवार केला आहे.
मुख्यमंत्री शिंदे यांनी आपला नियोजित दिल्ली दौरा रद्द करून पुण्यातील पूर परिस्थितीची पाहणी केली. तेथील नागरिकांशी संवाद साधून मदत केली. तर दुसरीकडे उद्धव ठाकरे मात्र मंगळवारपासून तीन दिवसीय दिल्ली दौऱ्यावर आहेत.
ठाकरेंच्या या दिल्ली दौऱ्यावरून शिंदेंच्या शिवसेनेने उद्धव ठाकरेंवर Uddhav Thackeray व्यंगचित्राच्या माध्यमातून निशाणा साधला आहे. पुण्यातील पूरग्रस्त नागरिकांना मदत करण्याऐवजी दिल्लीत मुजरा करणे महत्वाचे, अशा आशयाचे व्यंगचित्र रेखाटून ठाकरेंवर टीकास्त्र सोडले आहे. हे व्यंगचित्र शिवसेना पक्षाच्या अधिकृत फेसबुक पेजवर प्रसारित झाले असून या व्यंगचित्राची सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चा रंगली आहे.
(Edited by Sunil Dhumal)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.