Sanjay Raut: 'लोकसभेनंतर ठाकरे गटात फक्त पिता-पुत्रच...,' राऊतांच्या 'त्या' वक्तव्यावर शिंदे गटाचं प्रत्तुत्तर

Kiran Sonavane On Sanjay Raut: "संजय राऊतांनी त्यांच्या शिल्लक सेनेची पर्वा करावी, शिवसेनेची पर्वा करण्याची गरज नाही. दररोज वेगवेगळ्या पक्षातून पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाकरे गटातून तर रांगच लागली आहे."
Eknath Shinde, Uddhav Thackeray, Aditya Thackeray
Eknath Shinde, Uddhav Thackeray, Aditya ThackeraySarkarnama

Lok Sabha Election 2024: संजय राऊतांनी (Sanjay Raut) त्यांच्या शिल्लक सेनेची पर्वा करावी, शिवसेनेची पर्वा करण्याची गरज नाही. दररोज वेगवेगळ्या पक्षातून पदाधिकारी कार्यकर्ते शिवसेनेत प्रवेश करत आहेत. ठाकरे गटातून तर रांगच लागली आहे. उद्धव ठाकरे गटाचा सुपडा साफ झाला आहे. लोकसभा निवडणुकीनंतर ठाकरे गटात केवळ पिता-पुत्रच शिल्लक राहतील आणि संजय राऊत बाहेर उभे असतील अशी बोचरी टीका शिंदेंच्या शिवसेनेचे प्रवक्ते किरण सोनवणे (Kiran Sonavane) यांनी केली आहे.

शिवसेना ठाकरे गटाचे नेते तथा खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी लोकसभा निवडणुकीनंतर दोन-चार महिन्यात शिंदेगट दिसणार नाही अशी टीका केली होती. राऊतांच्या याच वक्तव्यावर आता शिवसेना (Shivsena) शिंदेंगटाचे प्रवक्ते किरण सोनवणे यांनी प्रत्तुत्तर दिलं आहे. तसेच राऊतांनी नवनीत राणा यांच्याबद्दल केलेल्या आक्षेपार्ह विधानानंतर ठाकरे गटाच्या महिला प्रवक्त्या मूग गिळून गप्प का आहेत? असा सवाल उपस्थित करत सोनवणे यांनी सुषमा अंधारे यांचं नाव न घेता हल्लाबोल केला आहे.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

सोनवणे म्हणाले, ठाकरे गटाच्या महिला प्रवक्त्या राऊतांनी राणांबद्दल केलेल्या विधानानंतर मूग गिळून गप्प का आहेत? त्यादेखील या विधानाशी सहमत आहेत का? तुम्ही जर स्त्रियांच्या सन्मानाबाबत बोलू शकत नसाल, तर इतर कुठल्याही गोष्टीबाबत बोलण्याचा तुम्हाला अधिकार नाही, असा टोला सोनावणे यांनी सुषमा अंधारे (Sushma Andhare) यांना लगावला.

यावेळी बोलताना किरण सोनवणे यांनी संजय राऊत फुले-शाहू-आंबेडकरांचे नाव घेऊन महाराष्ट्रात प्रचार करतायत. परंतु, फुले शाहू आंबेडकरांनी स्त्रीचा सन्मान करायला शिकवलं आहे. नवनीत राणा या खासदार असून त्या एकत आघाडीच्या नेत्या आहेत त्यांच्याबद्दल संजय राऊतांनी ज्या प्रकारची भाषा वापरली ती राऊतांची विकृत मनोवृत्तीचे प्रदर्शन करत आहे, असंही सोनवणे यावेळी म्हणाले.

महिला सन्मानाची बात करणाऱ्या सुषमा अक्का कुठे आहात तुम्ही?

सोनवणे यांच्याप्रमाणेच शिंदे गटाच्या महिला प्रवक्त्या ज्योती वाघमारे यांनीदेखील सुषमा अंधारेंवर निशाणा साधला आहे. वाघमारे म्हणाल्या, "हा शिवछत्रपतींचा, जिजाऊ, सावत्री, रमाईचा महाराष्ट्र आहे ना मग याच महाराष्ट्रात महिलांचा असा अपमान होताना उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) गप्प का आहेत? कित्येकवेळेला महिला सन्मानाची बात करणाऱ्या सुषमा अक्का कुठे आहात तुम्ही? या महाराष्ट्रातील दमलेल्या बाबांच्या लेकी सुप्रिया सुळे आणि प्रणिती शिंदे (Supriya Sule and Praniti Shinde) मूग गिळून का बरं गप्प आहात? का फक्त स्वत:ची बुलंद कहाणी लिहण्यात व्यस्त आहेत." अशी टीका वाघमारे यांनी केली.

Eknath Shinde, Uddhav Thackeray, Aditya Thackeray
Supriya Sule News : 'भ्रष्टाचाराचा आरोप झाला एक जण भाजपत गेला', सुप्रिया सुळेंनी केली पोलखोल

बाळासाहेब ठाकरे असते तर राऊतांना जोड्याने हाणले असते

नवनीत राणा यांच्या संदर्भात संजय राऊतांनी अत्यंत खालच्या पातळीची भाषा वापरली आहे. आता बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांनी राऊतांना जोड्याने हाणले असते. महाविकास आघाडीला लाज आणणारी वक्तव्ये संजय राऊतांनी केली आहेत. एखाद्या महिलेला नाची म्हणणे, तुम्हाला डोळे मारेल, बोलवेल अशी विधाने हा पुरोगामी महाराष्ट्र खपवून घेणार नाही, असं म्हणत वाघमारे यांनी राऊतांवर हल्लाबोल केला.

(Edited By Jagdish Patil)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com