Deepak Kesarkar : राज्यपालांच्या विरोधात शिंदे गट केंद्राकडे तक्रार करणार

मुंबईच्या उभारणीत मराठी, मुस्लिम, पारसी गुजरातीसह सर्वच समाजाचे योगदान आहे. मात्र यात सर्वांत मोठा वाटा मराठी माणसाचा आहे.
Deepak Kesarkar, bhagat singh koshyari
Deepak Kesarkar, bhagat singh koshyarisarkarnama
Published on
Updated on

मुंबई : "मुंबईतून गुजराती आणि राजस्थानी लोकं निघून गेल्यास पैसाच उरणार नाही, मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही, असं विधान राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (bhagat singh koshyari) यांनी केलं आहे. यामुळे नवा वाद निर्माण झाला आहे. (Deepak Kesarkar latest news)

कोश्यारींच्या या विधानावर चौफेर टीका सुरू आहे. शिंदे गटाचे प्रवक्ते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी राज्यपाल कोश्यारींची केंद्र सरकारकडे तक्रार करणार असल्याचे म्हटले आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

दीपक केसरकर म्हणाले, "राज्यपाल राजकीय व्यक्तीसारखी भाषण करू शकत नाही. त्यांच्या विधानामुळे वाद निर्माण झाला आहे. मुंबईच्या उभारणीत मराठी, मुस्लिम, पारसी गुजरातीसह सर्वच समाजाचे योगदान आहे. मात्र यात सर्वांत मोठा वाटा मराठी माणसाचा आहे,"

"एखाद्या समाजाने मुंबईतील पैसा काढला तर मुंबईत पैसा राहणार नाही असे बोलणे म्हणजे राज्यपालांना मुंबईबद्दल माहिती नसल्याने हे वक्तव्य केले असावे," असा टोलाही त्यांनी लगावला आहे.

Deepak Kesarkar, bhagat singh koshyari
Digvijay Singh : काँग्रेसच्या माजी मुख्यमंत्र्याने पोलिसाची कॉलर पकडली ; भाजप आक्रमक

"मुंबई मायानगरी आहे. मुंबईवर महालक्ष्मी, सिद्धिविनायकांचा आशीर्वाद आहे. उद्योगपती अंबानीबंधुही त्यांच्या दर्शनाला जातात. मुंबई पूर्वी ही गुजरात आणि महाराष्ट्र राजधानी होती. आता ती महाराष्ट्र राजधानी आहे. एकही मनुष्य येथे पैसे घेऊन आलेला नाही. येथे गुंतवणुक करुन अनेक जण मोठे झाले,"

"माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात (IT industry) अनेक मराठी नागरिक आहेत. आम्ही कोणाला परक म्हणत नाही. राज्यपालांनी जे वक्तव्य केलं ते त्यांनी कोणी तरी लिहून दिले असणार. ज्या विभागाने भाषण लिहून दिले त्या विभागात सुधारणा केली पाहिजे," असे केसरकरांनी सांगितले.

"राज्यपाल घटनात्मक पद आहे, त्यामुळे कोश्यारी यांच्याकडून यापुढे अशी विधाने येणार नाही अशी सूचना केंद्राने द्यावी, अशी मागणी दीपक केसरकरांनी केली आहे. मुंबईतील औद्योगिक उभारणीत मुंबईच्या उभारणीत पारशी समुदायाचे मोठे योगदान आहे. असेही त्यांनही यावेळी सांगितले.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com