Thane: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज (रविवारी) ठाण्यात भारतरत्न स्व. लता दिनानाथ मंगेशकर संगीत विद्यालयाचे (गुरुकुल)चे भूमिपूजन झाले. सध्याच्या राजकारणावर भाष्य करीत मुख्यमंत्र्यांनी ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांच्यावर निशाणा साधला. आमदार प्रताप सरनाईक यांच्या विकासकामांचे कौतुक करीत मुख्यमंत्र्यांनी राऊतांना चिमटा काढला.
"सध्या राजकारणात 'बेसूर' सुरु आहे. सकाळी उठून काही जण काव काव करतात आणि ते दिवसभर सुरू राहते. त्यामुळे प्रदूषण देखील वाढलेले आहे. परंतु आमच्या आमदार प्रताप सरनाईकांनी ठाण्यात मधुर गायन कोकिळा आणण्याचे प्रयत्न सुरु केला आहे," अशा शब्दात मुख्यमंत्री शिंदेंनी राऊतांची खिल्ली उडवली. ज्येष्ठ गायिका उषा मंगेशकर उपस्थित होत्या.
"अनेक जण खूप निधी मागतात मी ज्यावेळेस बाहेर गुवाहाटीला होतो तेव्हा प्रताप नाईक यांनी माझ्या सह्या घेऊन ठाण्यात अनेक विकास कामे करून घेतली. त्यामुळे ठाणे बदलत आहे," असे मुख्यमंत्री म्हणाले.
"ठाण्याचे रूप पालटणारे मुख्यमंत्री शिंदे आणि प्रताप सरनाईक यांचे मी अभिनंदन करते. लता मंगेशकर गुरुकुल माझ्या मंगेशकर कुटुंबाकडे सोपवण्यात आले याबद्दल मी त्यांची आभारी आहे. ठाण्यात शोभेल अशी ही इमारत ते बांधत आहेत. संगीतमय अशी इमारत उभारणार आहे, त्याचा सर्वांनी लाभ घ्यावा," असे उषा मंगेशकर म्हणाल्या.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.